शिवसैनिकांनो, काम करा नाहीतर पद सोडा - दिवाकर रावते

संजय सोनोने
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

नवरात्रीपर्यंत शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जावर कर्जमाफी न केल्यास पदाधिकार्‍यांनी प्रत्येक बँकेत जावून शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी.

शेगाव : आलेल्या संकटातून शिवबंधन असलेला शिवसैनिकच आपल्याला बाहेर काढू शकतो असा आधार महिलांना, मजुरांना व दीनदुबळ्यांना वाटत असतो. एवढी मोठी क्रांती शिवसेनेने केली आहे. प्रत्येक शिवसैनिकाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शिवसेना घराघरात पोचविण्यासाठी अग्रेसर असले पाहिजे. तसेच, पदाधिकारी यांनी प्रचंड काम करण्याची आवश्यकता असून, काम न करणार्‍यांनी पदावर न राहता शिवसैनिक म्हणून काम करावे, असे प्रतिपादन स्थानिक वर्धमान भवनमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात संपर्कप्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना घरा-घरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, निवडणुका येतील जातील, जिंकण्याची अथवा हारण्याची पर्वा न करता काम करत राहावे. शिवसेनेचा संपूर्ण हिंदुस्थानात दरारा आहे. नवरात्रीपर्यंत शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जावर कर्जमाफी न केल्यास पदाधिकार्‍यांनी प्रत्येक बँकेत जावून शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. तुम्ही व मी शिवसेनेचे सैनिक आहोत. हा माझा, तो माझा असे न करता प्रत्येकाला सोबत घेऊन काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

या पदाधिकारी मेळाव्यास खा.प्रतापराव जाधव, आ.श्रीकांत देशपांडे, मा.आ.संजय गावंडे, संजय गायकवाड, धिरज लिंगाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवंत, दत्ता पाटील, मा.आ.विजयराज शिंदे, जिल्हाउपप्रमुख संतोष लिप्ते, नगरसेवक दिनेश शिंदे, आशिष गणगणे, योगेश पल्हाडे, शांताराम दाणे, रविंद्र झाडोकार, रमेश पाटील, संतोष घाटोळ, गजानन हाडोळे, अजय अहिर, गोपाल बोरसे यांच्यासह असंख्य पदाधिकारी तथा शिवसैनिकांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’