युवा शेतकऱ्यांची आत्महत्या; मुलाकडून लिहून घेतली चिट्ठी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने अनेक दिवसांपासून ती वेगळे राहत होती. कर्जाचा वाढता बोजा आणि पत्नीअभावी घरची, मुलांची चिंता या विवंचनेत अखेर त्याने आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मागे आरती (५ वर्षे) आणि आतिष (७ वर्षे) अशी दोन मुले आहेत. मृतक वसंता याने आत्महत्येपूर्वी त्याच्या मुलाकडून चिट्ठी लिहून घेतली आहे. चिट्ठीमध्ये मृतकाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मुलांचा सांभाळ शासनाने करावा असे लिहिले आहे. मृतक शेतकऱ्याने चिट्ठी लिहून मुलाकडे दिली आणि मृत्यूला कवटाळले. वसंता राठोड याने आत्महत्या केल्याच्या घटनेला तब्बल दोन तास उलटून गेले तरी तालुक्यातील चान्नी पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते. उशीराने दाखल झालेल्या चान्नी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. पण आता त्या मृतक शेतकऱ्याच्या मुलांचा सांभाळ करणार कोण? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.

राज्य सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन हवेतच विरले असून, अजूनही हजारो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विदर्भातील विशेषत: अकोला जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अजूनही सुरुच आहे. गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, शुक्रवारी आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. राज्य शासनाने कर्जमाफीच्या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी समस्त शेतकरी वर्गातून होत आहे.

वसंतच्या मृत्यूनंतरही देहाची अवहेलना
गावंडगाव येथील वसंत कान्हू राठोड या युवा शेतकऱ्यांने आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळल्यानंतर या घटनेची माहिती चान्नी पो. स्टे. ला देण्यात आली असता पोलिसांनी मृतदेहाला ४ ते ५ तास उलटल्यानंतरही पंचनामा करण्याकरीता न आल्याने मृत्यूदेहाची अवहेलना झाली असून पोलिसांप्रती असंतोष व्यक्त होत आहे.

वसंताने मुलाकडून लिहून घेतली सुसाईड नोट
वसंताने आत्महत्या करण्यापूर्वी तो अशिक्षित असल्याकारणाने त्याच्या 7 वर्षीय मुलाकडून आत्महत्या पञ लिहून घेत शासनाचे दिरंगाईपूर्ण धोरण, सततची नापीकी,
कर्जबाजारीपणा, मुलांच्या शिक्षण, कुटूंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात पूर्णत: अपयशी ठरत असल्याकारणाने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे समजते.

Web Title: marathi news farmer suicide vidarbha