दुचाकीला अपघात दोन ठार; एक जखमी

दुचाकीला अपघात दोन ठार; एक जखमी

कारंजा : राष्ट्रीय महामार्ग 6 वरील देववाडीजवळ अज्ञात ट्रकने दुचाकी मागून धडक दिली. यात दोघे ठार तर एक जखमी झाला आहे.

नागपूर येथून रिसेप्शनवरून दुचाकीने बडनेरा येथे परत जात असताना आज पहाटे 3.15 ला दुचाकी क्र. महा 27 बिके 6648 या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यात रोशन वाळेकर (रा. बडनेरा) जागीच ठार झाला तर प्रफुल्ल विजय घोडेवार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

जखमी संदीप उत्तम नाले (वय 27) यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून आर्वी येथे रुग्णालयात नेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com