साश्रू नयनांनी हुतात्मा सुमेध गवई यांना अखेरचा निरोप

अनिल दंदी
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

बाळापूर : उसळलेला जनसागर.. लक्ष लक्ष नयनांतून ओघळणारे अश्रू...आणि सुमेद गवई अमर रहे... अशा जड अंतकरणाने  विरगती प्राप्त झालेले सुमेध गवई यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमेध यांच्या पार्थिवाला लहान भाऊ शुभम गवई यांनी अग्नी दिली. आज पहाटे त्यांचे पार्थिव नागपूरहून त्यांच्या मुळ गावी लोणाग्रा येथे रवाना करण्यात आले.   आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव अकोल्याहून लोणाग्रा गावात दाखल झाले.

बाळापूर : उसळलेला जनसागर.. लक्ष लक्ष नयनांतून ओघळणारे अश्रू...आणि सुमेद गवई अमर रहे... अशा जड अंतकरणाने  विरगती प्राप्त झालेले सुमेध गवई यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमेध यांच्या पार्थिवाला लहान भाऊ शुभम गवई यांनी अग्नी दिली. आज पहाटे त्यांचे पार्थिव नागपूरहून त्यांच्या मुळ गावी लोणाग्रा येथे रवाना करण्यात आले.   आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव अकोल्याहून लोणाग्रा गावात दाखल झाले.

जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देतांना सुमेध यांना वीरमरण आले. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अश्रूभरल्या डोळ्यांनी लोक ‘सुमेद गवई अमर रहे’ अशा घोषणा देत होते.

सकाळपासूनच लोणाग्रा येथे लोकांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता सुमेध यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लोणाग्रा येथे पोचताच लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला. प्रथम त्यांचे पार्थीव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले व त्यानंतर येथील प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात  दर्शनासाठी ठेवण्यात आले.

त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावरील गावांतील ग्रामस्थांनी गर्दी केली. त्यानंतर साडेबारा वाजता लोणाग्रा येथील कमानीपासून लाखों लोकांच्या उपस्थितीत दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या सामाजीक कार्येकर्ते रमेश चांडक यांच्या शेतात सुमेध यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वैकुंठ रथातून नेण्यात आले.

यावेळी ‘भारत माता की जय, अमर रहे.. अमर रहे.. सुमेध गवई अमर रहे’ अशा जयघोष करण्यात आला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात पोचल्या नंतर त्यांच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सुमेध यांचे वडील वामण गवई, आई मायावती, भाऊ शुभम, बहीण प्रिया, जावई व नातेवाईकांनी पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले.

त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी परीसरात व  रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर-दुर पर्यंत माणसांच्या रांगा लागल्या होत्या. मिळेल त्या जागी नागरिक उभे होते. काही जण झाडावर बसले होते. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्हाधिकारी अस्तीककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, पालकमंत्री रणजीत पाटील,  आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे रविन्द्र दारोकार, जेष्टीक फोरमचे राजेन्द्र पातोडे, शिवसंग्रामचे संदिप पाटील उपस्थित होते.

बौद्ध परंपरेनुसार त्रिशरण पंचशील व  सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली. व त्यानंतर सिएडी पुलगावचे जवान व स्थानीक पोलीस दला तर्फे  सलामी देण्यात आली. लष्कराच्यावतीने मानवंदना देण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. लष्कराच्यावतीनेही पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सुमेध गवई यांचे बंधू शुभम गवई यांनी चिताग्नी दिला.