आशिष देशमुखांचे ठिय्या आंदोलन मागे

Ashish-Deshmukh
Ashish-Deshmukh

नागपूर - २१ तारखेपासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परीक्षेचा विचार करून, तसेच माननीय न्यायालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करीत गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री उशिरा मागे घेतले. 

न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढत राहू, यात दुमत नाही. सहा दिवसांपासून गारपीटग्रस्तांना रास्त मोबदला मिळावा, याकरिता शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार याची दखल घ्यायला तयार नाही. शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, गारपीटग्रस्त व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. 
दरम्यान मंगळवारी दुपारी देशमुख यांच्या आंदोलनाला किसानपुत्र संघटनेचे अध्यक्ष अमर हबीब यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी हबीब यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान पॅंथरची स्थापना करावी, असेही आवाहन सर्व संघटना व राजकीय पक्षांना केले.

अमर हबीब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनील शिंदे, अहमद कादर, शेकापचे राहुल देशमुख, रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे भीमराव बनसोड, स्वाभिमानी संघटनेचे प्रशांतभाऊ मोहोड व सुरेश सुरतकर, शेतकरी नेते महादेव नखाते, सुमंतराव रिधोरकर, लक्ष्मणराव मेहर, अनंत भोयर, जगन्नाथजी मेतंगले, राम्भानुजी रेवतकर, अप्पाजी दाढे, ठाकरे गुरुजी, रमेशबाबू जैस्वाल, वसंतराव पानतावणे व इतर मान्यवरांनी आदींनी भेट दिली तसेच समर्थनही जाहीर केले.

भविष्यातील पर्याय खुले
बारावीची परीक्षा सुरू होत आहे. आंदोलनामुळे वातावरण बिघडून माझ्या मतदासरसंघातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न अद्याप संपलेले नाहीत. त्यामुळे ही लढाई सुरूच राहणार आहे. आवश्‍यक त्या परवानग्यांसह गरजेनुसार पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा पर्याय आम्ही खुला ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com