बीटी कापूस बियाणे ६० रुपयांनी स्वस्त

Cotton
Cotton

नागपूर - बीटी कापूस बियाणे दर नियंत्रण समितीच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या हंगामात बीजी-२ कापूस बियाणे प्रती पाकीट ७४० रुपयांना तर बीजी-१ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल कापूस बियाणे ६३५ रुपयांना उपलब्ध होणार आहे. 

३०० कोटींची होणार बचत 
देशात वर्षाला ५०० दशलक्ष बियाणे पाकिटांची विक्री होते. सरकारने आता ६० रुपये प्रती पाकीट दर कमी केल्यास शेतकऱ्यांचे कंपन्यांना जाणारे सुमारे ३०० कोटी रुपये वाचणार आहेत.

देशातील बहुतांश राज्यात यावर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बोलगार्ड-२ तंत्रज्ञान बोंड अळी नियंत्रणासाठी पूरक ठरत नसल्याने त्यापोटी आकारण्यात येणारे ४९ रुपयांचे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याची मागणी नॅशनल सीड असोसिएशनकडून करण्यात आली होती. तसेच असोसिएशनने बीजोत्पादनाशी निगडित विविध खर्चात वाढ झाल्याने बीटी बियाणे दर प्रती पाकीट १५० रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com