इंग्लंडच्या आरोपींचा सव्वा लाखाने गंडा

Crime
Crime

नागपूर - इंग्लंडमधील मित्राने पाठविलेले ख्रिसमस गिफ्ट सोडविण्याच्या नावावर नागपुरातील एका महिलेला सव्वा लाख रुपयांनी गंडा घातला. या प्रकरणी इंग्लंडमधील आरोपीसह दिल्लीतील सोफिया नामक तोतया कस्टम ऑफिसरवर सीताबर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला.

ममता ईश्‍वरीप्रसाद कालबेडे (47, रा. कोष्टीपुरा, सीताबर्डी) यांची फेसबूकवरून इंग्लंडमधील ऍलेक्‍स हेन्‍री याच्यासोबत मैत्री झाली. त्याने डिसेंबर 2017 मध्ये ममता यांना इंग्लंडवरून मोठे ख्रिसमस गिफ्ट पाठवले. त्याबाबत दोघांमध्ये फेसबूक आणि व्हॉट्‌सऍपवरून चर्चा झाली. 17 जानेवारी 2018 ला ते गिफ्ट दिल्लीला पोहोचल्याचे ममता यांना तोतया कस्टम अधिकारी सोफीया यांनी सांगितले. गिफ्ट खूप महागडे असल्याचे सांगून 1 लाख 14 हजार रुपये एसबीआयच्या दोन अकाउंटमध्ये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर ममता या गिफ्ट नागपुरात येण्याची वाट पाहात होत्या. मात्र, गिफ्ट आले नाही. त्यांनी चौकशी केली असता, ऍलेक्‍स आणि सोफीया या दोघांनीही संगनमत करून लुबाडल्याचे लक्षात आले. त्यामुळे सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com