आणीबाणीत कारावास भोगणारे अखेर गवसले 

आणीबाणीत कारावास भोगणारे अखेर गवसले 

नागपूर - आणीबाणीच्या काळात नागपूर कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ५० जणांच्या नावांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नावांची यादी मागविण्यात आली होती. मात्र, कारागृह प्रशासनाने रेकॉर्ड मिळत नसल्याचे मौखिक कळविले होते. विशेष म्हणजे कारावास भोगणाऱ्यांना निवृत्तिवेतन देण्याचे प्रयत्न राज्य शासनातर्फे सुरू आहेत. एकूण तीनशेच्या जवळपास कारावास भोगल्यांची संख्या असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. 

१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या काळात अनेक संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. या सर्वांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन पेन्शन लागू करण्याचा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यास सकारात्मकता दर्शविली. आणीबाणीचा काळ स्वतंत्र भारतातील होता. स्वातंत्र्यसंग्रामाशी याचा संबंध नसल्याने त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्यास काहींनी विरोधही दर्शविला. त्यानंतर शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याचा विचार मागे टाकत या कैद्यांचा गौरव, सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यांना महिन्याला निश्‍चित लाभ किंवा एकरकमी लाभ देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. यासाठी महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमार्फत याचे निकष निश्‍चित केले जाणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये या राज्यांमध्ये कैद्यांच्या सन्मानासाठी योजना लागू आहे. त्याचाही अभ्यास समिती करणार आहे. लाभार्थ्यांना एकरकमी रक्कम द्यावी की महिन्याला वेतन, त्यामुळे राज्यावर येणारा आर्थिक भार याचाही विचार करून अहवाल सादर करणार आहे. 

शिक्षा भोगणाऱ्यांची नावे
बापूराव वराडपांडे, पांडुरंग भिसीकर, डॉ. डी. बी. अग्रवाल, अन्नाजी राजेधर, विठ्ठल बिधलकर, क्रिष्णराव मोहरी, आचार्य अवसुल, दौलत सोवल, रामदास गजभिये, एस. एन. काळे, डॉ. कमलाकर टोटाळे, माळीभाई व्यास, अमन लोहकरे, देवराव कोल्होरे, वासुदेव गाडगे, भार्गवसिंग सडलकर, प्रभाकर टालालुले, प्रभाकर सगदेव, गुणवंत चोटी, मनोहर समर्थ, के. आर.  रंगनाथराव, विनायक पाठक, विलास फडणवीस, दिवाकर धाकवड, नेतलाल पटले, मनोहर शेंडे, बी. डी. ढोके, भाऊराव कोळी, पुरुषोत्तम जोशी, सीताराम रामपुरे, दिवाकर धांडे, गजानन वाघ, अनंत हरकरे, डी. डी. डीडोलकर, पांडुरंग धारगावे, प्रभाकर भोजराज, वामन वाघ, शंकर हडप, वसंत पुराणिक, पुरुषोत्तम गोरे, द्वरकाप्रसाद डी. पांडे, डी. एस. जोशी, गंगाधर मांगळे, गंगाधर मारखेळकर, अविनाश संगवई, टी. एस. बढिये, अभय देशपांडे, रवींद्र जोशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com