Nana Patole
Nana Patole

मोदींच्या पापाचे भांडे मी फोडणार: नाना पटोले

नागपूर - देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 42 टक्के वाढ झाली आहे. मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्यासोबत वाद घातला होता. मोदी हे खरच मागास जातीचे आहे काय याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे. त्यांच्या पापाचे भांडे फोडणार, असे वक्तव्य खासदारकीचा राजीनामा देणारे खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीला विरोध करत शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आता गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरून ते मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले आहे.

पटोले म्हणाले, की मी 11 तारखेला राहुल गांधींसोबत सभेत गुजरातमध्ये सहभागी होणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. माझ्या जागेवर निवडणूक होईल की नाही हे माहित नाही. दानवे हे फार महान आहेत मी शेतकऱ्यांच्या प्रती बहुजनांसाठी राजीनामा दिला. दानवे आपली खुर्ची वाचवण्यासाठी बोलले असतील. केंद्र सरकारमध्ये जे चाललंय ते संविधानिक व्सवस्थेसाठी चांगले नाही. नोटबंदी हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. राहुल गांधी यांचे व्हिजन चांगले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर ही राजीनामा देण्याची वेळ आली नसती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com