संघयंत्रणा निवडणूक सज्जतेच्या दिशेने

संघयंत्रणा निवडणूक सज्जतेच्या दिशेने

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंदाची अ. भा. प्रतिनिधी सभा रविवारी संपली. त्याचप्रमाणे कार्यकारिणीतील सहसरकार्यवाहांची संख्या वाढविण्यात आली आहे. हा अनपेक्षित, पण मोठा बदल व प्रतिनिधी सभेत चर्चिले गेलेले विषय पाहता संघयंत्रणा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज होत असल्याचे व त्या यंत्रणेचा फायदा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला करून देण्याचे संकेत मिळत आहेत.

संघाच्या या वेळच्या प्रतिनिधी सभेत केंद्रातल्या सरकारवर सरळ टीका करणारा कोणताही प्रस्ताव पारित करण्यात आला नाही. उलट, सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात टीकेचा सूर लावणाऱ्या स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ या संघटनांची भूमिका मतभेद नव्हे, तर ‘मतभिन्नता’ आहे, असे खुद्द चौथ्यांदा सरकार्यवाह झालेले भय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या विधानाद्वारे या संघटनांना काहीशी मवाळ भूमिका घेण्याचे संकेत अप्रत्यक्षपणे संघाने दिले आहेत.

संघाच्या कार्यकारिणीत यंदा झालेले बदल अनपेक्षित आहेत. मुळात यंदा सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनाच बदलले जाईल, अशी मीडियात चर्चा होती. पण, तसे काही झाले नाही. संघाच्या कार्यपद्धतीची माहिती असलेल्यांना त्याचे काही वाटलेही नाही. संघ कधीही तात्कालिक फायदा डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेत नाही. निश्‍चित दिशा व दूरगामी फायद्याचा विचार संघाच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे असतो. कार्यकारिणीतील बदलही त्याचेच सूचक आहेत. भय्याजींना सरकार्यवाह म्हणून कायम ठेवतानाच संघाने या वेळच्या कार्यकारिणीत प्रथमच त्यांच्या सोबतीला सहा सहसरकार्यवाह दिले आहेत. ही संख्या दोनने वाढली आहे. अगोदरच्या कार्यकारिणीतील दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी, भागय्याजी व डॉ. कृष्णगोपाल या चार सहसरकार्यवाहांसोबतच डॉ. मनमोहन वैद्य व मुकुंदजी हे नवे सहसरकार्यवाह म्हणून घोषित झाले आहेत. त्याची घोषणाही संघाच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आली. सहसरकार्यवाहांची संख्या वाढवून सहा करण्याचा अर्थ स्पष्ट आहे. संघाने नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली सेना 

संघयंत्रणा निवडणूक सज्जतेच्या दिशेने
अधिक मजबूत केली आहे. मनमोहन वैद्य हे जुन्या कार्यकारिणीत प्रचारप्रमुख होते. त्या नात्याने ते प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जायचे. तर, मुकुंदजी सहबौद्धिक प्रमुख होते. 

केंद्रात व अनेक राज्यांत संघविचाराला मानणारी सरकारे अस्तित्वात आली आहेत. संघविचाराचा प्रसारही वेगाने विविध क्षेत्रांत व्हायला लागला आहे. त्यामुळे अलीकडे डाव्या विचारांच्या पुरोगामी संघटना आक्रमकपणे सरकारवर व संघविचारांवरही तुटून पडल्या आहेत. संघ आजवर या डाव्या विचारांना पुरून उरला आहे. पण, आताच्या डाव्या आक्रमणाचा फटका संघापेक्षाही जास्त भाजप सरकारांना बसण्याची शक्‍यता लक्षात घेऊन डाव्यांच्या आणि पुरोगाम्यांच्या आक्रमणाला तोंड देणे हे संघयंत्रणेसमोरचे आगामी काळातील मुख्य लक्ष्य राहणार आहे. त्याच दृष्टीने या बदलांकडे पाहिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com