आता नेतेही शेतकरी आरक्षणाच्या बाजूने - शैलेश अग्रवाल

marathi news vidarbha farmer agriculture government
marathi news vidarbha farmer agriculture government

वर्धा (जि. आर्वी) - शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्याच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. लढा सुरु व्हायला आता एक वर्ष होत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी ते प्रगतिशील शेतकरी असा शेतीतला प्रवास पाहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी आपल्या शेतकरी बांधवांपुढे शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडली. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच आत्मीयतेने मांडलेल्या शेतकरी आरक्षणाच्या विषयाला ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी स्विकारले. शेकडो ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या आरक्षणाचा ठरावही घेतला सरकारातील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आले. हा लढा सर्वत्र जोर धरत असतांना कालपरवा खुद्द देशाच्या माजी कृषिमंत्र्यांनी म्हणजेच शरद पवार यांनी शेतकऱ्याला आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्टोक्ती केली आहे.

आता नेतेही शेतकरी आरक्षणाच्या बाजूने असल्याचे हे चित्र एकच मिशन शेतकरी आरक्षणाचा शेतकरी आरक्षणाचा लढा अधिक मजबूत करणारे आहे. तसाही आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही पण आजवर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले. पण एकच मिशनने त्यापलीकडे जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतीची आणि शेतकऱ्याची होत असलेली दयनीय अवस्था थांबविण्यासाठी कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशात सीमेवर लढणाऱ्या जवानाला आरक्षण आहे. मग देशात जय जवान जय किसान तर म्हटले जाते तर त्या शेतात लढणाऱ्या शेतकऱ्याला आरक्षण का नाही. हा सामान्य शेतकऱ्याला पडलेला असामान्य प्रश्न एकच मिशनने हेरला आहे आणि सेवाग्राम येथून सुरु झालेला शेतकरी आरक्षणाचा लढा देशाच्या उत्तरेतील हरियाणापर्यंत जाऊन पोहचला आहे. हरियाणातील एका गावामध्ये गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्याला आरक्षण मिळाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे.

शैलेश अग्रवाल यांनी मंत्रालयात पोहचून अनेक मंत्र्यांना आपल्या शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला काहींनी त्यावर चर्चा केली काही मंत्र्यांनी प्रस्ताव  ठेऊन घेतला तर काहींनी नुसताच पाहून हे शक्य नसल्याची प्रतिक्रियाही दिली पण काही का असेना शेतकरी आरक्षणावर नेते आता बोलते झाले आहे. शेतकऱ्याला आरक्षण मिळाले पाहिजे तो त्याचा हक्क आहे अशी मागणी एकच मिशनच्या वतीने सतत लावून धरली जात आहे. आत्ता खुद्द देशाच्या माजी कृषी मंत्र्यांनी शेतकरी आरक्षण मिळाले पाहिजे असे मुंबई येथील पत्रकार परिषदेत सांगितले आहे ते एकप्रकारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या मुद्द्याचे समर्थनच म्हणावे लागेल. हा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देशपातळीवर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. ठिकठिकांणी शांततेच्या मार्गाने आपली हि मागणी मिशनच्या वतीने सर्वांसमोर पुढील टप्प्यात मांडली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com