पोलिस कर्मचाऱ्याला पोहता आलेच पाहिजे

Sakal-Vishesh
Sakal-Vishesh

नागपूर - पोलिस दलात बदलांची सुरुवात झाली असून कोणत्याही स्थितीवर नियंत्रण मिळवता यावे यादृष्टीने प्रत्येक कर्मचारी ‘फिट’ असावा, यासाठी पोहता येणे आवश्‍यक करण्यात आले आहे. तसा लेखी आदेशच पोलिस महासंचालक कार्यालयातून प्रत्येक आयुक्‍तालय वा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला आहे. 

पोलिस विभाग ‘डिजिटल’ करण्यावरही महासंचालकाचा भर आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला संगणकाचे ज्ञान देणे सुरू आहे. मात्र, पोलिसात भरती होणाऱ्या प्रत्येकाला पोहता आलेच पाहिजे, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भरती झालेल्या नव्या कर्मचाऱ्याला पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोहणे शिकल्यानंतरच पोलिस संबंधित कर्मचाऱ्याला नियमित करण्यात येणार आहे. अप्पर पोलिस महासंचालक राजेश वैद्य यांच्या कार्यालयातून नुकतेच शुद्धिपत्रक वजा आदेशपत्र सर्व पोलिस प्रमुखांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार सन २०१८ च्या पोलिस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमदेवारांना पोहण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारांना आता केवळ केवळ मैदानी कामगिरीवर गुण घेऊन चालणार नाही. पोहणे येत नसेल तर निवड होऊनही घरी बसण्याची वेळ येऊ शकते.

पोहणे येत नसल्यामुळे अनेकदा अडचणी येतात. कुणी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्याला वाचविणे शक्‍य होत नाही. पूर आल्यास वा खोल पाण्यात कुणी पडल्याची स्थिती उद्‌भवल्यास पोलिस कर्मचारी कुणाचा जीव वाचवू शकतो. शहर पोलिस दलातील २२ टक्‍के पोलिस तंदुरुस्त नाहीत. कुणाचे पोट सुटले आहे तर कुणाला आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना कार्यालयीन लेखी काम देण्यात येते. नागपुरातील अर्ध्यापेक्षा जास्त पोलिसांना पोहणे येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com