विदर्भवाद्यांचे तिसऱ्या मोर्चाशी गुफ्तगू 

विदर्भवाद्यांचे तिसऱ्या मोर्चाशी गुफ्तगू 

नागपूर - कॉंग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या मोर्चाशी आघाडी करण्यासाठी विदर्भवादी तयार झाले आहेत. या संदर्भात विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज स्वराज्य अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्याशी नागपुरात चर्चा केली. 

स्वराज्य अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी श्रीहरी अणे यांच्याशी चर्चा केली. या वेळी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासोबत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत करावयाच्या आघाडीबाबतही चर्चा केली. यात कॉंग्रेस व भाजपसोबत कोणतीही आघाडी करावयाची नाही, याबाबत एकमत झाले. देशात कॉंग्रेस व भाजपला दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न डाव्यांतर्फे सुरू झाला आहे. या डाव्या आघाडीशी संधान बांधण्यावरच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विदर्भात कॉंग्रेस व भाजप विदर्भवाद्यांशी आघाडी करणार नाही, हे उघड असल्याने तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडल्याचे सांगण्यात येते. योगेंद्र यादव चर्चेसाठी आल्याचे समजते. या आघाडीत आता किती पक्ष सामील होणार आहे, याबद्दल मात्र अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भवाद्यांना फारसे यश मिळाले नाही. यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भवाद्यांचे उमेदवार कितपत प्रभावी राहतील, हा प्रश्‍नही आता उपस्थित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com