हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याची आत्महत्त्या

death
death

दिग्रस : तालुक्यातील मोख क्र.२ येथील शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना रविवार (ता.१०) दुपारी १२ च्यासुमारास घडली. शेषराव भावराव पऊळ (वय ४३ वर्ष रा.मोख क्र.२) असे आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, सततची नापीकी व कर्जाला कंटाळून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरयाने आत्महत्त्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

अल्पभूधारक असलेले शेतकरी शेषराव पऊळ यांनी विष प्राशन केल्यानंतर पत्नी व मुलीला आवाज देऊन विष घेतल्याचे सांगून आता मी मरणार आहे, मला दवाखान्यात नेऊन काहीच उपयोग नाही. मात्र, पत्नीने धीर न सोडता आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतातील नागरिकांना बोलवून उपचारासाठी दिग्रसच्या ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र, दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच शेषराव यांची प्राणज्योत मावळली.

शेषराव यांना सततची नापीकी व मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपवली असल्याची चर्चा ग्रामीण रूग्णालय परिसरात नातेवाईक व गावकरी करीत होते. त्यांच्या पश्चात विधवा आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीनंतर शेषराव यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक,पोलिस शिपाई दत्ता पवार, संतोष चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com