तहसीलदारांनी ठोठावली ठेकेदाराला दंडाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

उमरखेड तालुक्यातील बंदी बागांमधील भवानी बोरगांव रस्त्यावर चालू असलेल्या कामाकरिता पद्धतीचे उत्खलन शेजारील नाल्यावरुनच ठेकेदारा कडून मोठ्या प्रमाणात केले जात होते. उमरखेड तालुक्यातील रेती कंत्राटदारावर नासिक ते वरखेड तहसीलदारांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा फास आखल्याने सभेची उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.

उमरखेड : उमरखेड तालुक्यातील भवानी बोरगाव रस्त्यावर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाकरिता संसदेतील ठेकेदार चिद्दरवार अवैद्य रेती उत्खनन करित असल्याची तक्रार शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजा मयेकर यांनी तहसीलदार भगवान कांबळे यांच्याकडे केली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ पावले उचलत भवानी बोरगाव रस्त्यावर जाऊन ३५ रेती साठा जप्त करुन फिरते पथकाने पंचनाम्याचा अहवाल तहसीलदाराकडे सादर केला आहे असुन त्या संदर्भाची नोटीस ठेकेदाराला ठोठावली आहे.

उमरखेड तालुक्यातील बंदी बागांमधील भवानी बोरगांव रस्त्यावर चालू असलेल्या कामाकरिता पद्धतीचे उत्खलन शेजारील नाल्यावरुनच ठेकेदारा कडून मोठ्या प्रमाणात केले जात होते. उमरखेड तालुक्यातील रेती कंत्राटदारावर नासिक ते वरखेड तहसीलदारांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा फास आखल्याने सभेची उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत. परंतु पुसद येथील कंत्राटदार चिद्दरवार यांनी थेट तहसीलदारांलाच आवाहन देण्याकरिता ठेकेदार चिद्दरवार यांनी किनवट वरून 30 गाढवांच्या जोड्या आणून गाढवा मार्फत खरबी वन्यजीव अभयारण्यामधील नाल्यावरील अवैध रेतीचे गाढवामार्फत उत्खनन करण्याची शक्कल लढवित रेती साठा जमा करून झालेल्या रेती साठ्यातून तात्काळ पुलाचे बांधकाम करण्याचा महापराक्रम सदर ठेकेदारांनी शकली द्वारे केला. त्यामुळे तहसीलदारांना आव्हान करण्याचा पर्याय सदर ठेकेदाराने निवडला होता. याबाबतची तालुक्यात मोठी चर्चा होत असतानाच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेश खामनेकर यांनी तहसीलदाराकडे तक्रार करून अवैध उत्खनन प्रकरणी चिद्दरवार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी फिरते पथक तात्काळ भवानी बोरगाव रस्त्यावर पाठवले व रेती साठा जप्त केला.

सदर ठिकाणी 35 ब्रास रेती साठा असल्याची माहिती मिळाली याशिवाय दीडशेच्या वर ब्रास रेती उत्खलन करुन बांधकामास वापरली असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणी फिरते पथकांनी पंचनामा करून कारवाईसाठी तहसीलदार यांच्याकडे अहवाल दिला असुन अहवालानुसार ठेकेदार चिद्दरवार यांना दंडाबाबत व फौजदारी कारवाई बाबत नोटीस ठोठावली असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: marathi news Yavatmal news tahsildar notice