वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू 

Marathi News_Vidarbha_Tiger Attack
Marathi News_Vidarbha_Tiger Attack

सिंदेवाही - शेतात काम करित असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. महिलेचा मृतदेह सकाळच्या सुमारास छिन्नविछिन्न अवस्थेत दयागोंदी गांगीझोरा परिसरात आढळून आला. सदर महिलेचे नाव कमल केशव निकोडे (वय ५०) आहे. सिंदेवाही तालुका ताडोबा बफर झोनला लागून असल्याने इथे वाघाची दहशत नेहमीच असते. वाघाच्या हल्ल्याच्या घटना नियमित घडत असतात. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतशिवारात काम करणे शेतकऱ्याना जोखमीचे झाले आहे. 

काल शनिवारी (ता. 9) सकाळी 12 वाजता कमलबाई निकोडे आपल्या शेतावर गेल्या होत्या. संध्याकाळी बराचवेळ होऊन सुद्धा कमलबाई घरी आल्या नसल्याने त्यांची सर्वत्र चौकशी झाली. भारतमाता चौकात राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने निकोडे परिवाराने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली पण काहीच कळू शकले नाही. 

रविवारी पहाटे पुन्हा शोध घेतला असता दयागोंदी गांगीझोरा परिसरातील शेतात काम करित असलेल्या कमल निकोडे ला वाघाने हल्ला करून ठार केल्याचे आढळून आले. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सिंदेवाही रेल्वे पुलाला लागून असलेल्या दयागोंदी जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी पो नि इंगळे आणि नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली असता सदर घटना घडली असल्याचा दुजोरा देत वाघाला शोधण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वनपाल करंडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com