महापौर जिचकार यांचे ’काउंटडाउन’ सुरू!

Nanda-Jichkar
Nanda-Jichkar

नागपूर - महापौर नंदा जिचकार यांची गच्छंती अटळ असून महापौर परिषदेनंतरच मुहूर्त ठरला असल्याची चर्चा आज शहरात रंगली. मुलाला खासगी सचिव म्हणून अमेरिकावारी केल्यावरून पक्षात महापौर नंदा जिचकार यांच्याबाबत अद्यापही नाराजी कायम आहे. यात शहरातील आमदारांचाही समावेश असल्याने त्यांची उचलबांगडी निश्‍चित समजली जात आहे. 

महापौर नंदा जिचकार यांना पदावरून काढणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस रंगली आहे. शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी काल, शुक्रवारी महापालिकेत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेतून महापौर बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम ते लावतील, अशी अपेक्षा होती. सुरुवातही त्यांनी त्याचपद्धतीने केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी जो निर्णय घेतील, तो मान्य करावा लागेल, असे नमूद करीत त्यांनी नंदा जिचकार महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना राजकारणात तासातासात काहीही होऊ शकते, असे सांगून महापौरांची गच्छंती अटळ असल्याचे संकेत दिले. 

मात्र ही गच्छंती कधी होणार? याबाबत भाजपमध्येच अधिक उत्सुकता दिसून येत आहे. येत्या २७ ऑक्‍टोबरला नागपुरात महापौर परिषद आयोजित करण्यात आली आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या पुढाकारानेच ही परिषद नागपुरात होत आहे. त्यामुळे या परिषदेनंतर त्यांची उचलबांगडी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मुलाला खाजगी सचिव म्हणून अमेरिकेला घेऊन गेल्याने भाजपच्या प्रतिमेलाही चांगलेच तडे गेले होते. याप्रकरणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही नागपुरात येताच महापौर नंदा जिचकार यांना पाचारण करून जाब विचारला होता. 

वर्षा ठाकरे, मनीषा कोठे चर्चेत 
नंदा जिचकार यांच्या वारसदार म्हणून वर्षा ठाकरे, मनीषा कोठे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, अचानक अनपेक्षित नावही वेळेवर पुढे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यात महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्या एका सदस्याच्याही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com