महिलांनो प्रतिष्ठेत गुरफटू नका, चक्रव्यूह भेदा - नंदा जिचकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

नागपूर - घर आणि शिक्षणाच्या चक्रव्यूहात महिला गुरफटून जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकीला शैक्षणिक गुणवत्तेनुसारच व संबंधित क्षेत्रातच नोकरी हवी असते. ती मिळाली नाही तर काय करावे सुचेनासे होते. यातून नैराश्‍य येते. बेरोजगारीचे हेसुद्धा एक कारण आहे, असे सांगून नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी शिक्षण घेताना स्वतःचा शोध घ्या, आवडी-निवडी जोपासा, असा सल्ला समस्त महिलांना दिला. 

महापौरांनी बुधवारी महिला दिनी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आपण महिला असल्याचा अभिमान असल्याचे सांगून महापौर म्हणून महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करता आला असे भाग्य आपल्याला लाभल्याचे सांगितले. प्रारंभी सकाळचे युनिट व्यवस्थापक संजीव शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर जिचकार यांचे स्वागत केले. या वेळी सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: mayor visit to sakal office