"नंदुरबारमध्ये लवकरच वैद्यकीय महाविद्यालय' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

नंदुरबार - आदिवासी भागातील लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार होत असलेले आजचे सातपुडा महाआरोग्य शिबिर म्हणजे देशातील ऐतिहासिक आरोग्य मेळावा आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून, जिल्ह्यातील आरोग्य व सिंचनाच्या मुख्य प्रश्‍नासह सर्वच प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यासाठी लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला सुरवात करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना दिली. 

सातपुडा महाआरोग्य मेळावा येथील निझर रस्त्यावरील मोदी मैदानावर आजपासून सुरू झाला. त्याचे औपचारिक उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते.