अचलपूर : मनोरुग्णाने पळवली खासगी प्रवासी बस; जीवितहानी नाही

पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने एसटी पळवून ती भरधावपणे रस्त्यावर चालवत अपघात घडविला होता
Private-Bus
Private-Bussakal

अचलपूर : काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने (mentally unstable person)एसटी (ST)पळवून ती भरधावपणे रस्त्यावर चालवत अपघात घडविला होता. त्यात काहींना जीवही गमवावा लागला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आज परतवाडा शहरात घडली, मात्र सुदैवाने आजच्या घटनेत तसे काहीही घडले नाही.परतवाडा शहराच्या बसस्टॉपवर (Bus Stop)आज सकाळच्या सुमारास अमरावतीसाठी प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभी असलेली खासगी बस एका मनोरुग्णाने पळविल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Private-Bus
पुणे : Swimming pool बंद का?...जलतरणपटूंचा सवाल!

रस्त्याने जाणारे दोन-तीन नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अचलपूर येथील किसन म्हसंगे या रहिवाशाचा समावेश आहे. त्यांच्या डोळ्याला इजा झाली असून सायकलचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.या मनोरुग्णाने आज (ता. १०) सकाळी १० वाजेच्या सुमारास परतवाडा बसस्थानकावर उभी असलेली बस पळविली. चालकाला नेमके काय घडले हे समजण्यापूर्वीच ही बस चक्क अमरावती मार्गावर पळायला लागली. काही अंतरावर विदर्भ मिल परिसरात ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. यामध्ये ट्रॅव्हल्सचे फार मोठे नुकसान झाले नाही. संबंधित व्यक्तीला नागरिकांनी पकडले व परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध वाहन चोरून नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Private-Bus
महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न ; छगन भुजबळ

प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात

आज सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे खासगी वाहनात प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसून आले. ट्रॅव्हल्सच्या चालकाने वाहनाला चावी ठेवून स्वतः चहा पिण्यास गेला कसा? असा प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत.

वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार चावी वाहनाला नव्हती, मात्र चौकशीदरम्यान चावी वाहनाला असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर मनोरुग्ण व्यक्तीने बसस्थानकावर उभी असलेली खासगी बस पळवून नेली. मात्र मोठा अनर्थ टळला. त्याच्यावर वाहन चोरून नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

- चंद्रकांत बोरसे, पोलिस उपनिरीक्षक, परतवाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com