#MilkAgitation मालेगावात स्वाभिमानीचे आंदोलन हिंसक; दुधाचा टॅंकर पेटविला 

#MilkAgitation Swabhimani Agitation Is Going Violent At Malegaon
#MilkAgitation Swabhimani Agitation Is Going Violent At Malegaon

वाशीम: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध आंदोलनाची वाशीम जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. आज ता.16 मालेगावात स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी राजहंस दुध कंपनीचा दुधाचा टॅंकर जाळण्याचा प्रयत्न केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर दुध दरवाढीसाठी दुध आंदोलन छेडले आहे. या अनुषंगाने वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरवात केली आहे.

आज ता.16 दुपारी बारा वाजता राजहंस दुध कंपनीचा दुध घेऊन येणारा टॅंकर मालेगाव येथील शेलू चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविला. सरकार विरोधी घोषणा देत असताना टॅंकर चालकाने पळ काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टॅंकरच्या चाकावर ज्वलशिल पदार्थ टाकून आग लावली. दहा ते बारा कार्यकर्त्यांनी  घोषणा देत तेथून पसार झाले. जोरदार पाऊस सुरू असल्याने आग लवकरच विझली. यात टॅंकरचे किरकोळ नुकसान झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची घोषणा केली असताना या चौकात कोणताही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com