मुलांच्या कृष्णकृत्यात' पालक दोषी नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नागपूर - मुलांचा कोणत्याही कृष्णकृत्यात समावेश असू नये, अशी प्रत्येकच वडिलांची अपेक्षा असते. यामुळे मुलाच्या वाईट कृत्यासाठी वडिलांना दोषी धरणे अयोग्य आहे. "क्‍लाउड 7 बार' प्रकरण कसे घडले, त्याची पार्श्‍वभूमी तपासली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांची पाठराखण केली. 

क्‍लाउड सेव्हन बार प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत. घटनेबाबत पुढे आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बारमध्ये मुली दिसत आहेत. मुली कशा आल्या. त्या वेटर होत्या काय, घटना नेमकी कशातून घडली, याबाबतचा सखोल तपास केला जावा. 

मुलांना वाचविण्यासाठी आमदार खोपडे यांनी फोनही केले नाहीत. उलटपक्षी प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आपणही प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या बाजूने असल्याचे ते म्हणाले. 

बारसंदर्भातील कायदा होणार कठोर 
बारमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन असल्याचे दिसून येत आहे. उत्पादनशुल्क विभागाचे त्यावर लक्ष आहे. पण, कायदे कठोर नसल्याने बार संचालकांचे फावते. अधिवेशनात बारशी संबंधित कायदे कठोर करण्यात येणार आहेत. अवैध दारूविक्रेत्यांना जामीन मिळू नये, मद्य वाहून नेणारे वाहन सरकारकडे जमा व्हावे, ग्रामसभेच्या ठरावानुसार दुकान गावापासून लांब न्यायचे आदी तरतुदी नियमात केली जाणार आहे. बारचे परवाने देताना संबंधित व्यक्तीवर दखलपात्र फौजदारी गुन्हे दाखल आहेत काय, याची शहानिशा केली जावी, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केली.

विदर्भ

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

09.21 AM

नागपूर - धंतोलीच्या गल्ल्यांमधील ‘ब्लॉकेज’ काढल्यानंतर तशाच पद्धतीचा वापर वाहतूक शाखेतर्फे धरमपेठेत गुरुवारपासून केला जात...

09.18 AM

नागपूर - पाचपावलीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि बिर्याणी हॉटेल मालक अब्दुल्ला खान सईमुल्ला खान (वय ५०, रा. नवी वस्ती...

09.18 AM