पीकविम्याच्या रकमेबाबत मंत्र्यांचे बँकाना निर्देश

minister take instruction to bank for crop insurance
minister take instruction to bank for crop insurance

अकोला : खरिपाच्या तोंडावर पीकविम्याची रक्कम बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केली. शासनाच्या आदेशानंतरही परस्पर रक्कम वळविल्याने दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत तातडीने बैठक घेवून बँकांना तत्काळ पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वळती करण्याचे निर्देश दिले.

अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली. पीकविम्याची रक्कम मिळाल्यानंतर ती कर्जखात्यात परस्पर वळती करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले होते. त्यानंतरही परस्पर रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात असल्याचा दावा राज्य सरकारने केला असताना ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती दुष्काळात पडणारी रक्कमही हिरावल्या गेली.

त्यामुळे पेरणीसाठीही पैसे शिल्लक नाहीत अशी परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे येऊ लागल्यात. भाजपचे अकोला तालुकाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शेतकऱ्यांची ही कैफियत आमदार रणधीर सावरकर यांच्या कानावर टाकली. आमदारांनी मुंबईमध्ये संबंधित अधिकारी व मंत्र्यांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी समाजावून सांगल्या. शेतकऱ्यांचा रोष यामुळे राज्य सरकारवर येत असल्याने परिस्थितीचे भान ठेवून मंत्र्यांनी तत्काळ पीककर्जाच्या रकमा कर्ज खात्यातून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. 

शेतकऱ्यांची स्थिती आमदार रणधीर सावरकर यांना दिल्यानंतर त्यांनी मुंबईत अधिकारी व मंत्र्यांची भेट घेवून कर्ज खात्यात जमा रकमा पुन्हा शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करून दिली.  

- अनिल गावंडे, भाजपा तालुकाध्यक्ष, अकोला

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आधीच नापिकी, दुष्काळ व इतर कारणांमुळे पेरणीचीही सोय नाही. अशावेळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांचा आधार होती. ती परस्पर वळती केल्याने शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, हा प्रश्‍न होता. या परिस्थितीबाबत मंत्र्यांना माहिती दिली. त्यांनी त्यावर बँकांना तत्काळ सूचना देऊन वळवलेली रक्कम परत करण्याचा आदेश काढला.
-आमदार रणधीर सावरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com