मुलांच्या ‘मोबाईल ॲडिक्‍शन’मुळे पालक हैराण

Mobile-Addiction
Mobile-Addiction

नागपूर - आईने हातून मोबाईल घेतल्याने बुधवारी महादुला येथील इयत्ता नववीतील प्रीतल चंद्रमणी गोंडाणे हिने गळफास लावला. हरियानामध्ये नऊ वर्षांच्या मुलाने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सुरुवातीला कौतुकाने हट्ट पूर्ण करणाऱ्या पालकांना मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागल्याने पालक हैराण झाले आहेत.

आई-बाबा सर्व हट्ट पुरवतात, हे माहीत असल्याने मुले ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करू लागतात. मी जेवणार नाही, बोलणार नाही इथपासून घरातून निघून जाईन, आत्महत्या करीन अशी धमकी देतात. अशा वेळी पालकांनी हतबल होण्यापेक्षा निग्रहाने मुलाच्या सवयींमध्ये बदल करणे, त्याला सामाजिक बांधीलकी शिकवणे, शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्यास शिकवणे आदी उपाय अवलंबणे आवश्‍यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान वयातच मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, टेनिस एल्बो, खांदा दुखणं, बोटं दुखणं, सुजणं, स्टीफ राहणं, पाठीच्या कण्याचा त्रास या समस्या वाढल्या. तरुण मुलांमधे दारूच्या अधीन होणं, झोपेच्या गोळ्या खाणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं, नैराश्‍य येणं अशी लक्षणे दिसत आहेत.

मुले ग्रुपने उभे असतील तर मोबाईलमध्ये डोके घालून दिसतात. त्यांना समजावायला गेले तर आमचे विचार बुरसटलेले आणि अविकसनशील असल्याचे बोलले जाते.
- मुकेश गोतमारे, पालक, अवस्थीनगर.

ॲडिक्‍शन असे ओळखावे 
 वास्तवातल्या मित्रांपेक्षा ऑनलाइन मित्रांसोबत वेळ घालवणे.
 ऑनलाइन असताना अडथळे आल्यास चिडचिड करणे.
 पूर्वी त्याला रस असलेल्या गोष्टींमध्ये अजिबात रस न वाटणे.
 इंटरनेट वापराबाबत गुप्तता पाळणे.
 कुटुंब, मित्रपरिवारासोबत फार वेळ न घालवणे.

पालकांनी हे करावे
 लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलचा वापर हॉलमध्येच करावा.
 इंटरनेटवर काय पाहावं, काय पाहू नये यावर चर्चा करावी.
 रात्री झोपण्यापूर्वी सर्व मोबाईल एकत्र असावेत.
 पालकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय मोबाईल हातात घेऊ नये.
 आर्थिक अडचणी मुलांना माहिती करून द्याव्यात.
 मुलांना वेळ देऊन संवाद साधावा.
 आजाराप्रसंगी हॉस्पिटलमध्येदेखील मुलांना बरोबर ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com