खामगावात चिमुकलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

खामगाव तालुक्यातील अंत्रज गावात 6 वर्षीय चिमुकल्या मुलीवर गावातीलच तरुणाने जबरीने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली.

खामगाव (बुलढाणा) - देशभर आसिफाला न्याय मिळावा यासाठी आंदोलने सुरू असतानाच आणखी एक चिमुकली नराधमाच्या वासनेची शिकार झाली आहे. खामगाव तालुक्यातील अंत्रज गावात 6 वर्षीय चिमुकल्या मुलीवर गावातीलच तरुणाने जबरीने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील 6 वर्षीय मुलीचे वडील रात्री शेतात गेले होते. तर आई घरात जेवण करत होती. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकल्या मुलीस गोपाल गजानन कोकाटे (वय 20) याने तिला बाजूला बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन अत्याचार केला. ही बाब मुलीने आईला सांगितली. तिच्या आईने खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार केली. त्यावरून गोपाल कोकाटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक रफीक शेख करत आहेत. कठुवा आणि उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनानंतर देशभर निषेध होत असताना अत्याचाराच्या घटना मात्र घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: molested a little girl in khamgaon