मंगोलियन पाहुणे "स्मार्ट स्ट्रीप'वर 

मंगोलियन पाहुणे "स्मार्ट स्ट्रीप'वर 

नागपूर - "स्मार्ट सिटी'तील आदर्श म्हणून विकसित होत असलेल्या "स्मार्ट स्ट्रीप'ला नागपूरकरांनी पसंती दिली. आता ती विदेशी पाहुण्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. शहराच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या मंगोलियन शिष्टमंडळाने सोमवारी या स्मार्ट स्ट्रीपसह 24 बाय 7 योजनेची पाहणी केली. 

मंगोलिया येथील शिष्टमंडळ आणि जीआयझेड नेक्‍सस सदस्यांच्या शिष्टमंडळाचे सोमवारी सकाळी शहरात आगमन झाले. या शिष्टमंडळाने सर्वप्रथम नीरीला भेट देऊन वरिष्ठ संशोधकांसोबत चर्चा केली. दुपारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली असलेल्या व सार्वजनिक वाय-फाय सुविधा असलेल्या स्मार्ट स्ट्रीपवरील शंकरनगर चौकाला भेट दिली. या शिष्टमंडळाने या प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतली. त्यांनी शहरातील 24 बाय 7 योजना पाणीपुरवठा असलेल्या वॉर्डांची पाहणी केली. या वेळी मनपाचे उपअभियंता दुपारे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंगोलियन पथकात गिझ नेक्‍सस येथील प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर रुठ एरबेक, तांत्रिक तज्ज्ञ आल्फ ट्रॉस, मंगोलियाचे राष्ट्रीय समन्वयक एस. टीसेरेदास, मंगोलिया येथील उलानबंटूर शहरातील महापौर कार्यालयातील प्रमुख व उलानबंटूर शहर प्रकल्पाचे महाव्यवस्थापक टी. गंतुमूर, महापौर कार्यालयातील जल व सांडपाणी विषयाचे संचालक तुरखू, झॉरिटसारुजखंगई, वरिष्ठ अधिकारी तुमूरबतर, श्री. बोरोचुलून तुमेनजार्गल, आयसीएलइआय साऊथ एशियाचे प्रकल्प सहायक धिर्ती जाडे, व्यवस्थापक रितू ठाकूर यांचा समावेश आहे. 

सांडपाणी पुनर्चक्रीकरण प्रकल्पाला आज भेट 
मंगोलियाचे शिष्टमंडळ उद्या, 21 मार्चला रोजी सकाळी 10 वाजता मनपा मुख्यालयात येणार आहे. त्यांच्यापुढे महापालिका अधिकारी विविध प्रकल्पाचे सादरीकरण करतील. त्यानंतर भांडेवाडी येथील सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्पाला शिष्टमंडळ भेट देईल. त्यानंतर महाजनको ऊर्जा प्रकल्पाला भेट देईल. फुटाळा येथील दौराही शिष्टमंडळ करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com