भवनच्या शेतात पिकले मोत्याचे पीक

- कपिल वानखेडे
शनिवार, 28 जानेवारी 2017

खापरखेडा - विदर्भातील शेतकरी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्येचा मार्ग धरत आहेत. शेतातील पिकाला योग्य भाग मिळत नाही. निसर्गाची साथ मिळत नसल्याने नापिकी येते. मात्र, याच शेतीत नवा बीज सापडला. दहेगाव रंगारी येथील शेतकरी भवन पटेल यांनी तेलंगखेडी येथील अभिनव प्रयोग करीत मोत्याची शेती केली. समुद्राच्या तळाला शिंपल्यात मिळणारे मोती आता येथे पिकू लागल्याने सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे. 

सावनेर तालुक्‍यातील तेलंगखेडी येथील जमिनीत माती कमी आणि दगडच मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अंकुर येत नव्हते. त्यामुळे खर्च करून उत्पन्न होत नसल्याने त्रस्त झालेल्या भवन पटेल यांनी दोन वर्षांपूर्वी प्रयोग सुरू केला. 

शेतात एक एकर शेतीमध्ये पाण्याचे टाके बनविले. नैसर्गिक प्रक्रिया करून मोत्यांची शेती करण्याचे ठरविले. समुद्रासह नदी-नाल्यांतील शिंपले जमा करून नैसर्गिक प्रक्रिया केली. त्यांनी पहिल्या वर्षी काही काळे मोती शिंपल्यामध्ये रोपवून परिपक्‍व केले. 

काळा, पांढरा, गुलाबी मोत्याची शेतातील टाक्‍यात रोपटे उभे केले. दोन वर्षांत मोत्याच्या शेतीमध्ये मेहनत घेत मोत्यांची शेती पिकविली व सहा हजार काळ्या मोत्याचे उत्पादन झाले. पांढरा मोती हा देशात सापडतो. काळा मोती विदेशात सापडतो. काळ्या मोत्याची दोन हजार ते तीन हजारदरम्यान किंमत आहे. 

कृषी प्रधान देशात काळ्या मोत्यांची शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होऊ शकतो. मोत्याची शेती कशी करायची, याबद्दल माहिती व प्रशिक्षण देण्याकरिता प्रयोगशाळा सुरू केली आहे. वर्षभरात देशभरातील बाराशे शेतकरी व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. 
- भवन पटेल

Web Title: moti crop in bhavan agriculture