रेल्वेखाली सापडून पिलांसह अस्वल ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मूल (जि. चंद्रपूर) - रेल्वेखाली सापडून दोन पिलांसह अस्वल ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना मूल रेल्वे स्थानकापासून तीन कि. मी. अंतरावर चिचाळा बिटाअंतर्गत येणाऱ्या टोलेवाही गावाजवळ घडली.

मादी अस्वलाने डिसेंबर 2015 मध्ये मूलजवळील रेल्वे पुलाच्या खाली या दोन पिलांना जन्म दिला होता. तिने पिलांसह तेथेच जवळपास दोन महिने मुक्काम ठोकला होता. तिच्या देखरेखीसाठी वन विभागाचा एक चमू तैनात करण्यात आला होता. त्यानंतर ती जंगलात निघून गेली होती. मूल-चंद्रपूर मार्गावर या अस्वलांना अनेकांनी पाहिले होते. रात्रीच्या वेळी रेल्वेखाली सापडल्याने या अस्वलांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. चंद्रपूर ते गोंदिया जाणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ही घटना गुरुवारी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली.