मुर्तिजापूर पंचायत समितीचा मनमौजी कारभार

Mumtizapur Panchayat do not work better
Mumtizapur Panchayat do not work better

अकोला (लाखपुरी) : पंचायत समिती मूर्तिजापूर मध्ये शिक्षकांच्या पॅन खात्यात मागील वर्षाचा व चालू वर्षाचा आयकर टिडिएस जमा न झाल्यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड व आयकर विभागाच्या नोटीसचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी शिक्षक चारशे रुपये प्रति शिक्षकाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच शिक्षण विभागात आयकराचे पैसे जमा करतात.

यामध्ये शिक्षकांचे सोळा नंबरचे फॉर्म व आयकर रिटर्न फॉर्म भरणे अपेक्षित आहे. परंतु मनमानी कारभारामुळे चारशे रुपये, सोळा नंबरचे फॉर्म शिक्षकांच्या माथी मारले जातात. प्रत्यक्ष संबंधीत वकिलाशी संपर्क साधला असता, त्याला चार क्वार्टरची फी 100 रुपये प्रति शिक्षक दिल्या जाते. मग उर्वरीत 300 रुपयांचे काय? हा प्रश्नही निर्माण होतो.

ऐवढे होऊन सुद्धा शिक्षकांच्या खात्यात टिडिएस जमा होत नाही. नियमाप्रमाणे 31 मे पर्यंत आयकर विभागाकडे टिडिएस जमा होने अपेक्षित आहे. त्यातही टिडीस जमा न झाल्यामुळे शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटिसा प्राप्त झाल्या. मागील वर्षीचा टिडिएस अद्याप पर्यंत खात्यात जमा झाला नाही त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना आयकर विभागामार्फत दंड ठोठावला आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करित आहे.

मंगळवारपर्यंत खात्यात टिडिएस जमा झाला नाही तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथ.वि), मुर्तिजापूर मार्फत आंदोलन करण्यात येईल.

मी वकीलाशी चर्चा करुन लवकर टिडीएस पॅन खात्यात जमा करण्यात येईल.

अंगर्ते, गटविकास अधिकारी पं.स. मुर्तिजापुर

मंगळवार पर्यंत टी.डी.एस. खात्यामध्ये जमा झाले नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल.
धर्मेद्रसिंग चौहाण, तालुका अध्यक्ष शिक्षक संघटना मुर्तिजापुर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com