महापालिका शिक्षकांना आरोग्यदायी शिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - दशकपूर्तीचे निमित्त साधून केअर हॉस्पिटलतर्फे नागपूर महापालिका शाळांमधील साडेतीनशे शिक्षकांना आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ताणतणावमुक्तीसह मधुमेह, रक्तदाब अशा आजारांना दूर ठेवण्यासंदर्भातील टिप्स देण्यात आल्याची माहिती केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वरुण भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या 23 तारखेला सायंकाळी 7 वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दशकपूर्ती सोहळा होईल. 105 खाटांच्या केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या दहा वर्षांत 4 लाख रुग्णांना तपासले. 20 हजारांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. 70 हजार किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. यापैकी 3 किडनी दान मेंदूमृत्यू झालेल्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती डॉ. भार्गव यांनी दिली. याशिवाय, हृदयविकारावरील अडीच हजार शस्त्रक्रिया झाल्या. 7 हजार कॅथ प्रक्रिया झाल्यात. यामुळेच अल्पावधीत सीजीएचएस, ईआयसी, एसईसीआर, मॉइल अशा शासकीय संस्थेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करार करण्यात आला. तर, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून गरिबांना येथे आरोग्यसेवा दिली जाते. 37 प्रकारचे विशेषज्ज्ञ येथे कार्यरत असून, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रुग्णांना केअर हॉस्पिटल वरदान ठरले आहे. "दी विक नॉइलसेन सर्व्हे 2016'नुसार शहरातील प्रथम दर्जाचे रुग्णालय असे मानांकन प्राप्त झाले असल्याचा दावा डॉ. भार्गव यांनी केला. पत्रकार परिषदेला संचालक अशोक गोयल, ललित अग्रवाल, दिलीप पचेरिवाला, सुकुमार पांडा, रवी मन्नादिया उपस्थित होते. 

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

02.30 PM

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

02.24 PM

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

02.24 PM