'काकू... माझे मम्मी-पप्पा मेले'

Nagpur
Nagpur

नागपूर : काकू... काकू... माझे मम्मी-पप्पा मेले... पप्पाच्या डोक्‍यातून रक्‍त वाहत आहे. अन्‌ मम्मीपण पडून आहे. वेदूताई तर बोलतपण नाही, अन्‌ कृष्णाही पडलेला आहे. चाला बरं आमच्या घरी, असे वैष्णवीने शेजारी राहणारी काकू लता यांना म्हटले.

वैष्णवीचे शब्द ऐकताच लता यांना धक्‍का बसला. लहान मुलींवर काय विश्‍वास ठेवावा, त्यामुळे त्या लगबगीने अर्चना यांच्या घरी गेल्या. तेथे रक्‍ताचा सडा आणि पाच-पाच मृतदेह पाहून मनाचा थरकाप उडाला. दृष्य बघून लता यांना काहीही सूचत नव्हते तर तोंडातून शब्दही बाहेर निघत नव्हता. दोन्ही चिमुकल्यांकडे पाहून त्यांचे दोन्ही डोळे डबडबले. त्यांनी दोघींनाही कवटाळत हंबरडा फोडला. त्यानंतर स्वतःला सावरत शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी जमल्यानंतर नंदनवन पोलिसांना माहिती देण्यात आली.

सोमवारी सकाळी आराधनागरात भयानक हत्याकांड उघडकीस आले. या नियतीच्या घाल्यातून वैष्णवी पवनकर आणि मिताली पालटकर या दैव बलवत्तर असल्याने बचावल्या. आरोपी विवेक पलाटकर या नराधमाने कृतघ्नतेचे दर्शन घडवित आपल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या जावाई कमलाकर पवनकर यांच्या संपूर्ण कुटूंबालाच यमसदनी धाडले. विकृत मानसिकतेच्या विवेकने बहिण, वृद्ध सासू, दोन चिमुकल्यावरही सब्बलने सपासप वार करीत रक्‍ताचा सडा पाडला. सकाळी डोळे चोळत झोपेतून उठलेल्या वैष्णवीला आई-वडील, बहिण रक्‍ताच्या सड्यात दिसले. त्यामुळे तिने मितालीलाही झोपेतून उठवले. घरातील रक्‍त पाहून दोघेही भेदरल्या. त्यांनी लगेच शेजारी राहणाऱ्या काकू लता यांच्या घरी धाव घेतली. घरात काय घडले, याची नेमकी कल्पना नसताना काकूंना घरात घडलेला प्रकार सांगितला. दुपारपर्यंत दोन्ही मुलींना कुणीही सांभाळणारे वाचले नसल्याने शेजाऱ्यांकडे बसून होत्या. नेमके काय झाले? याचा विचार करीत होत्या. त्यामध्ये खाकी वर्दीतील पोलिसही चारदा विचारपूस करीत होते. त्यामुळे मुली आणखीनच भेदरल्या होत्या. मात्र, सायंकाळ होताच दोन्ही मुली रडायला लागल्या. आता आम्ही कुणाकडे राहू? असा प्रश्‍न शेजाऱ्यांना विचारत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com