खलबत्त्याने ठेचून वृद्धेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - महादुल्यात राहणाऱ्यात प्रमिला मारोतराव कानफाडे (वय 62) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खलबत्त्याने ठेचून खून केला. हे हत्याकांड गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वृद्धेचा नातू मयूर कानफाडेवर संशय व्यक्‍त केला जात आहे. चोवीस तासांतील हे दुसरे हत्याकांड आहे. बुधवारी सकाळी गंगाजमुनात राजेश गंथाळेचा गळा चिरून खून झाला होता. 

प्रमिला कानफाडे या महादुल्यात नातू मयूर याच्यासह राहत होत्या. त्यांच्या पतीचे 2013 मध्ये निधन झाले. त्यांच्या दोनही मुलींचे लग्न झाले. मयूर हा प्रमिला यांच्या सावत्र मुलाचा मुलगा आहे. तो पशुपती कॉलेजला आयटीआयचा विद्यार्थी आहे. तसेच मौदा एनटीपीसीमध्ये रोजंदारीवर कामावरसुद्धा जात होता. मयूरला दारू आणि जुगार खेळण्याचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी तो नेहमी आजी प्रमिला यांना पैसे मागत होता. पैसे न दिल्यास शिवीगाळ आणि मारहाणही करीत होता. त्यामुळे प्रमिला यांनी तीन महिन्यांपूर्वी त्याला घराबाहेर काढले होते. तो मौद्यात राहणाऱ्या आईकडील आजी-आजोबांकडे राहायला गेला होता. गेल्या आठवड्यापूर्वी प्रमिला यांना दया आल्याने त्याला पुन्हा घरी बोलावले. तो पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालणे आणि घरातील सामानांची तोडफोड करीत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने विजेचे मीटर फोडले होते. प्रमिला यांनी मीटर दुरुस्तीसाठी वैभव निंबाळकर याला घरी बोलावले होते. वैभव आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घरी आला. आवाज दिल्यावर आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरात गेला असता त्याला स्वयंपाक घरात रक्‍ताच्या थारोळ्यात प्रमिला यांचा मृतदेह दिसला. बाजूलाच चाकू आणि खलबत्ता रक्‍ताने माखलेला दिसला. त्याने लगेच शेजाऱ्यांसह पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

मयूर आउट ऑफ कवरेज 
प्रमिला यांचा खून झाल्यापासून मयूर कानफाडे हा अचानक बेपत्ता झाला. त्याचा मोबाईलसुद्धा आउट ऑफ कवरेज दाखवत आहे. त्यामुळे पोलिसांनी मयूरवर संशय व्यक्‍त केला. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. मयूर हाती लागल्यावरच हत्याकांडाचा खुलासा होऊ शकतो. 

Web Title: murder case in nagpur