सत्तूरचे वार करून फोडले मेहुणीचे डोके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नागपूर - विवाहाला सातत्याने नकार मिळत असल्याने माथे फिरलेल्या जावयाने मेहुणीवर सत्तुराने सपासप वार करीत रक्तबंबाळ केले. काही जणांनी जिवाचा धोका पत्करून हाती सत्तूर घेतलेल्या सिद्धार्थला पकडले. ही महिला थोडक्‍यात बचावली. हा रक्तरंजित थरार शुक्रवारी दुपारी मानकापुरातील झेंडा चौक परिसरात घडला. या प्रकरणी सिद्धार्थ आवळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

शांतीनगरात राहणाऱ्या सिद्धार्थने त्याची मेहुणी वंदना कावरे (27, रा. जुनी वस्ती, झिंगाबाई टाकळी) हिला मोपेडने जाताना थांबविले. काही कळायच्या आतच सत्तूरने वंदनाच्या डोक्‍यावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळली. ही थरारक घटना अनेकांनी बघितली. परंतु, आरोपीच्या हातात सत्तूर असल्याने तिचा बचाव करण्यासाठी प्रारंभी कुणी पुढे आले नाही. मात्र, काही जणांनी प्रसंगावधान दाखवत सिद्धार्थवर गोट्यांचा मारा सुरू केला. त्यामुळे तो जखमी वंदनापासून लांब गेला. यानंतर काही जणांनी झडप घालून त्याला पकडले. नंतर मात्र त्याला जबर चोप देऊन मानकापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिद्धार्थला अटक केली.

लग्नासाठी वार
सिद्धार्थ हा "सेंट्रिंग'चे काम करतो. वंदना ही त्याच्या पत्नीची धाकटी बहीण आहे. सिद्धार्थची पत्नी वंदनाच्या दुचाकीवर बसून जात असताना तिचा अपघाती मृत्यू झाला होता. "पत्नीच्या मृत्यूसाठी तूच जबाबदार असल्याने आता तू माझ्याशी लग्न कर', असा तगादा सिद्धार्थने तिच्याकडे लावला होता. या त्रासाला कंटाळून वंदनाने काही महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रारही दिली असल्याचे कळते.

टॅग्स

विदर्भ

नागपूर - माथाडी कामगारांचे वेतन चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन आठवड्यांमध्ये नव्याने निश्‍चित करा, असा आदेश बुधवारी...

02.00 PM

नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची...

01.57 PM

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

09.21 AM