कुरूम येथे मालगाडी रुळावरून घसरली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मूर्तिजापूर (जि. अकोला) - अकोल्यावरून नागपूरकडे जाणाऱ्या मालगाडीची ट्रॉली कुरूम रेल्वे स्टेशनजवळ आज दुपारी रुळावरून घसरली. त्यामुळे नागपूर व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मूर्तिजापूर, बडनेरा व अकोला येथेच थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. अहमदाबाद एक्‍स्प्रेससाठी लाइन क्‍लिअर करत असताना ही घटना घडला. यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या होत्या. भुसावळ-नागपूर या डाऊन रेल्वेलाइनवरील वाहतूकही विस्कळित झाली होती. रेल्वेलाइन दुरुस्तीचे कार्य युद्धस्तरावर करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यावर अकोला व मूर्तिजापूर येथे उभ्या असलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्या. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पोचले असून, घटनेचा सर्व बाजूने तपास करीत आहेत.