नागपुरात विक्रमी थंडी पारा 7.8 अंश सेल्सिअसवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नागपूर - "वरदा' वादळाच्या प्रभावामुळे कमी झालेल्या थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीची लाट सुरू आहे. सोमवारी रात्री नागपुरात नोंद झालेले 7.8 अंश सेल्सिअस इतके तापमान यंदाच्या हिवाळ्यातील नवा नीचांक ठरला.

नागपूर - "वरदा' वादळाच्या प्रभावामुळे कमी झालेल्या थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीची लाट सुरू आहे. सोमवारी रात्री नागपुरात नोंद झालेले 7.8 अंश सेल्सिअस इतके तापमान यंदाच्या हिवाळ्यातील नवा नीचांक ठरला.

वाशीमचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच शहरे थंडीच्या तीव्र लाटेच्या प्रभावाखाली आले आहेत. नागपुरात सोमवारी थंडीची तीव्रता अधिकच जाणवली. पारा सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी घसरून 7.8 अंशांवर आला. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी नोंदविलेले किमान तापमान या मोसमातील सर्वांत नीचांकी ठरले. याआधी नऊ डिसेंबरला पाऱ्यात 8.1 अंशांपर्यंत घसरण झाली होती. गोंदिया येथेही 8.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथेही पारा बारा अंशांच्या खाली आला आहे. थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

विदर्भ

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त शेगाव (बुलढाणा): यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा राहणार आहे. त्यामूळे...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

धंतोली झोनने हटविली दुकाने - मांस, चिकन जप्त नागपूर - पोळ्याच्या पाडव्याची संधी साधत अनेकांनी आज रस्त्यांच्या बाजूलाच...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

चौकातील हौदांवर नागरिक संतप्त - ‘सोशल मीडिया’वर काढले महानगरपालिकेचे वाभाडे नागपूर - फक्त सिमेंट रोड केले जात आहेत. सदोष...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017