काँग्रेसमधील एबी फॉर्म घोळामागे दडलंय काय? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : एका प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुकांना एबी फॉर्म देण्याच्या काँग्रेसच्या उत्साही निर्णयाची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात यामागे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. नागपूर भाजपला आंदणच देण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही युक्ती वापरली असावी, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

उमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. याबाबत भाजपलाच लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा काँग्रेसचेच नाराज नगरसेवक करीत आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजपात सर्वाधिक गोंधळ दिसून आला. परंतु, भाजपने यात नेमक्‍या उमेदवारांना उमेदवारी देऊन बंडखोरांचे आव्हान घेण्याची ताकद दाखविली. परंतु काँग्रेसने एक, दोन नव्हे तब्बल 22 जागांवर एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म दिले. एकाच जागेवर दोघांना एबी फॉर्म देऊन काँग्रेसने कुठल्या हुशारीचे दर्शन घडविले, यावर कालपासून काँग्रेसमधील नाराजांमध्ये चर्चा सुरू आहे.

151 जागा असताना अधिकचे एबी फॉर्म आले कुठून? असा सवालही केला जात आहे. एका जागेसाठी दोन एबी फॉर्म ती जागाच वांध्यात टाकण्याचा निर्णय अनेक वर्षे राजकारणात मुरलेले नेते कधीही घेणार नाही. मग कुठल्या दबावात हा निर्णय घेऊन शहरातून काँग्रेसला संपविण्याचा डाव खेळण्यात आला? असे एक नव्हे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

एबी फॉर्मचा सर्वांत मोठा घोळ उत्तर नागपुरात झाला. अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. यामागे काँग्रेसचेच काही नेते काँग्रेसमुक्त शहराचा 'अजेंडा' राबवीत असल्याचे एका उमेदवारी नाकारलेल्या नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सध्या काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली, त्यांच्या निवडून येण्याची क्षमताही बघितली नाही. निवडून येण्याची क्षमता असलेले नगरसेवक, उमेदवारांना सोयीस्करपणे उमेदवारी टाळण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपशी सौदेबाजी केली असावी, अन्यथा कुणीही सत्तेत परत येण्याची संधी सोडण्याची हिंमत केली नसती, अशी खुमासदार चर्चाही रंगली आहे.