अंतर्गत चढाओढीचा उमेदवारांनी घेतला धसका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नागपूर : महापालिका निवडणुकीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससह पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपमध्येही अंतर्गत चढाओढ दिसून येत आहे. याचा इतर उमेदवारांनीही धसका घेतला असून, काहींनी वैयक्तिक पातळीवर व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. 

नागपूर : महापालिका निवडणुकीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससह पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपमध्येही अंतर्गत चढाओढ दिसून येत आहे. याचा इतर उमेदवारांनीही धसका घेतला असून, काहींनी वैयक्तिक पातळीवर व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. 

काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण नवे नाही. शनिवारी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत पुन्हा गटातटाच्या राजकारणाची किनार दिसली. काँग्रेसमध्ये अनेक गट असून, एकाच प्रभागात वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवार असल्याने एकमेकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी 'एकला चलो रे'चा मार्ग अवलंबविला आहे. 

याचवेळी भाजपमध्ये वरकरणी गटाचे राजकारण दिसून येत नसले तरी मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडाळीमुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे. भाजपच्या अनेक प्रभागांत निष्ठावंतांना उमेदवारी डावलली. त्यामुळे अनेकांनी बंडासह इतर पक्षांचा झेंडा हाती घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे काहींनी बंड मागे घेतले. परंतु, ते पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी कितपत काम करतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

थंडावलेल्या बंडोबांना प्रभागाच्या व्यूहरचनेपासूनही दूर ठेवण्यात येत असल्याचे भाजपमधील शांत झालेल्या बंडखोराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अशी वागणूक मिळत असल्याने नको ती निवडणुकीची कटकट, अशी पुस्तीही त्याने जोडली. महालवरील एका प्रभागात हिंदुत्ववादी संघटनेद्वारे भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारण्यात आली. या कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाली. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी या महालमधील या प्रभागातून अंग काढून घेतले आहे. शनिवारी याच उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री गडकरींची सभाही झाली. परंतु, सभेलाही प्रतिसाद न मिळाल्याने चारही उमेदवारांत निराशा दिसून येत आहे. 

गटातटाचे राजकारण 
दक्षिण नागपुरातील एका प्रभागात भाजपने नवे चेहरे दिल्याने येथेही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असून, ते प्रचारापासून लांब आहेत. पश्‍चिम नागपुरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या एका प्रभागात महिला कार्यकर्त्यानेच प्रमुख उमेदवारापुढे आव्हान उभे केले आहे. एकूणच काँग्रेस, भाजपमधील उमेदवारांनी या बंडाळी व गटातटाच्या राजकारणाचा धसका घेतला आहे.

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

01.15 PM

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

01.15 PM

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

01.15 PM