गावठाणातील १० लाख घरे अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - मेट्रो रिजनचा आराखडा अंतिम होताच गावठाणांमध्ये वर्षांनुवर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे आणि भूखंड एका फटक्‍यात अनधिकृत झाली आहेत. सुमारे १० लाख घरे आणि दोन लाख भूखंडांचा यात समावेश आहे. आता ते नियमित करायचे असले, तर सुमारे १० ते १५ लाख रुपये नियमितीकरण शुल्क नागरिकांना भरावे लागणार आहे.

नागपूर - मेट्रो रिजनचा आराखडा अंतिम होताच गावठाणांमध्ये वर्षांनुवर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे आणि भूखंड एका फटक्‍यात अनधिकृत झाली आहेत. सुमारे १० लाख घरे आणि दोन लाख भूखंडांचा यात समावेश आहे. आता ते नियमित करायचे असले, तर सुमारे १० ते १५ लाख रुपये नियमितीकरण शुल्क नागरिकांना भरावे लागणार आहे.

गावठाण क्षेत्रात घरांचे बांधकाम करताना एन. ए., टी. पी. करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. ताबा पत्रावर घरे बांधली जातात. मागील काही वर्षांमध्ये शहराच्या सीमेलगत शेकडो ले-आउट पाडले. शेतांमध्ये ले-आउट पाडून व्यावसायिकांनी ते विकले. नागरिकांनी कमी दरात भूखंड घेऊन घरे बांधली. गावठाण क्षेत्रात काही घरे शेकडो वर्षांपासून आहेत. वडिलोपार्जितही घरे व वाडे आहेत. त्यांच्याकडे जमिनीची मालकीवगळता कुठलेच कागदपत्रे नाहीत. फक्त ग्रामपंचायती कराची पावती आहे. 

गावठाणातील १० लाख घरे अनधिकृत
बहुतांश भूखंड अकृषक करण्यात आलेले नाहीत. नगररचना विभागाची मंजुरी नाही. अशी सर्व घरे आणि भूखंड मेट्रो रिजनच्या आराखड्यानुसार आपसूकच अनधिकृत झाली आहेत. या घरांची किंमत आजच्या बाजारभावानुसार पाच ते सात लाखांवर नाही. मात्र, ते नियमित करायचे असेल तर सुमारे १० ते १५ लाख रुपये त्यांना मोजावे लागणार आहेत. गावठाणांमधील घरांच्या नियमितीकरणाची तरतूद आराखड्यातच करण्याची मागणी आधीच करण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकरिता आक्षेपही नोंदवण्यात आले होते. धोरण ठरविण्याचीसुद्धा मागणी करण्यात आली होती. मात्र, कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. 

१५ हजार कोटींच्या उत्पन्नावर डोळा
गावठाणातील १० लाख घरे आणि दोन लाख भूखंड नागरिकांनी नियमित केल्यास एनएमआरडीएला १५ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. तीनशे कर्मचाऱ्यांच्याही वेतनाचा प्रश्‍न सुटेल. याकरिता गावठाणच्या आक्षेपाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्वतःच्या पगारासाठी नागरिकांची गळचेपी केली जात असल्याने ग्रामीण भागात प्रचंड असंतोष उफाळला आहे.

नागरिक भयभीत
नियमितीकरणासाठी लाखो रुपये कुठून आणायचे? आपल्या घरावर नागपूर महानगर नियोजन प्राधिकरण बुलडोझर तर फिरवणार नाही? अशी भीती गावठाणमध्ये वर्षानुवर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना सतावत आहे.

Web Title: nagpur news 10 lakh homes unauthorized