आशावर्कर व गटकर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

आशावर्कर व गटकर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
आशावर्कर व गटकर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

हिंगणा (नागपूर): विविध मागण्यांसाठी तालुक्यातील आशावर्कर व गटकर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढून तहसीलदार प्रताप वाघमारे याना निवेदन दिले.

वानाडोंगरी परिसरातून आशावर्कर व गटप्रवर्तक संघटनेचे नेते कॉ. दिलीप देशपांडे, प्रभाकर भरणे, प्रवीण माणुसमारे, राम काळे, प्रीती मेश्राम, कल्पना लोखंडे, अश्विनी मानकर यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. तहसिल कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. आशावर्करना दहा हजार व गटप्रवर्तकांना पंधरा हजार मानधन देण्यात यावे, स्टेशनरी खरेदी, प्रवास भत्ता, कुटुंबनियोजन, पोलियो लसीकरण भत्त्यात वाढ करावी, तालुक्यात सोईयुक्त आशा कक्षाची स्थापना करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

मोर्चात शिवानी हातोडे, रविकांता बावणे, रंजना पौणिकर, कोमल जामगडे, ज्योती कडवे, निलोफर शेख, रुपलता बोबले, सुरेखा नॅनोरे, निकिता इंगोले, मंगला आकुलकर, रंजना कांबळे, मंदा अंधारे यांच्यासह आशावर्कर व गटप्रवर्तक मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com