‘ॲग्रोव्हिजन’ प्रदर्शनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर -  ‘ॲग्रोव्हिजन’ फाउंडेशनचे प्रदर्शन विदर्भाच्या विकासाचे ‘व्हिजन’ ठरत आहे. यंदाचे प्रदर्शन १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत रेशीमबाग मैदानावर होत आहे. उद्‌घाटन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण, जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर -  ‘ॲग्रोव्हिजन’ फाउंडेशनचे प्रदर्शन विदर्भाच्या विकासाचे ‘व्हिजन’ ठरत आहे. यंदाचे प्रदर्शन १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत रेशीमबाग मैदानावर होत आहे. उद्‌घाटन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण, जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे राहतील. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यांतील मंत्रीही उपस्थित राहतील. प्रदर्शनात चारशेपेक्षा अधिक कृषीविषयक कंपन्या, संसोधन संस्था, नवउद्योजक, शेतकरी संशोधक, वित्तसंस्था, कृषी विद्यापीठे, शेती संबंधित विभाग आणि सेवापुरवठादारांचा समावेश राहील. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान माहिती, कृषी संशोधन संस्था, शाश्‍वत शेतीच्या नव्या वाटा, नव्या दिशा, तज्ज्ञ शेतकरी आणि संशोधकांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्या प्रगतीची नवी दालने खुली होणार असल्याचे गडकरी म्हणाले. पत्रकार परिषदेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरवटकर, रमेश मानकर, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी होते.

यंदा पशुधन दालन
यंदा प्रथमच स्वतंत्र पशुधन दालन सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, कोंबड्या आदी जातीवंत पशुधन बघण्याची संधी उपलब्ध होईल. याशिवाय विदर्भ दुग्धविकास परिषद, बांबू लागवड व संधी, पाणीव्यवस्थापन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधमाशीपालन, शेतीपुरक व्यवसाय विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘अग्रोव्हिजन ॲप’चे उद्‌घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सकाळ’ची प्रशंसा
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’ चांगले काम करीत असल्याची प्रशंसा नितीन गडकरी यांनी केली. अग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केले जाणार आहे. सध्या सात अभ्यासक्रम तयार केले असून, एकूण २१ प्रकारचे अभ्यासक्रम तयार केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: nagpur news agrovision