मनोरुग्णालयातील दोन अटेंडंट्‌सला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नागपूर - नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी आणलेल्या मनोरुग्ण महिलेस बाह्यरुग्ण विभागासमोरच्या फुटपाथवर बांधून ठेवण्याचे प्रकरण ‘सकाळ’ने पुढे आणले. त्याची दखल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानुसार मनोरुग्णालय प्रशासनाने मनोरुग्णालयातील दोन अटेंडंट्‌सला नोटीस जारी केल्या.

मनोरुग्णालयातून मेडिकलमध्ये दररोज उपचारासाठी मनोरुग्णाला आणले जाते. दरम्यान, त्यांच्यावर अत्याचार करू नयेत, उपचारादरम्यान आवश्‍यक असल्यास वॉर्डात बांधून उपचार करण्यासंदर्भात नाही. परंतु, या मनोरुग्ण महिलेस जणू शिक्षा देण्यात आली. अशाप्रकारे मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोरच्या रस्त्यावरील फुटपाथवर चार तास बांधून ठेवले. हे मानवीयदृष्ट्या एकप्रकारे अघोरी कृत्य आहे. कायद्यानुसार अत्याचार प्रतिबंधक तरतुदींचे पालन करण्याच्या दिलेल्या सूचनांना मनोरुग्णालयातील परिचारिका, अटेंडंट यांनी छेद देत मनोरुग्ण महिलेस शिक्षा दिली. चार तास ही मनोरुग्ण महिला उकाड्यात पाण्याशिवाय उपाशी होती. तहानेने ती व्याकुळ झाली होती. परंतु, तिच्यावर दया दाखवली नाही. ही बाब निंदनीय असल्यामुळेच मनोरुग्णालयातील दोन अटेंडंट्‌सला कारणे दाखवा नोटीस जारी केल्या आहेत. 

कर्मचारी पळवाटा शोधण्याच्या तयारीत
स्क्रिझोफ्रेनियाची रुग्ण असल्याने ती त्रासदायक ठरली होती. मेडिकलच्या मानसोपचार ओपीडीत इंजेक्‍शन देऊन शांत करता आले असते. परंतु, एकप्रकारची शिक्षा म्हणून तिला फुटपाथवर बांधून ठेवले. मात्र, आता हे अटेंडंट्‌स २० ते २५ मिनिटं बांधून ठेवले होते, अशा साक्ष देत पळवाटा शोधतील, अशी चर्चा येथे आहे.