बॅंकेला २५ लाखांनी गंडविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नागपूर - घराच्या बनावट नोंदणीकृत खरेदी पत्राच्या माध्यमातून गृहकर्ज प्रकरणासाठी बॅंकेत अर्ज केला व कर्ज मंजूर करून घेतले. बॅंकेला २५ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी महिलेसह तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

हेमंत रामभाऊ गोरले, राकेशप्रसाद उदयराज शाहू व सोनी राकेशप्रसाद शाहू अशी आरोपींची नावे आहेत. मार्च २०१५ ते २०१६ दरम्यान आरोपींनी संगनमताने एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील फ्लॅट नं. २०२ पह नं. ३५ या घराचे बनावट नोंदणीकृत खरेदीपत्र तयार केले. त्या माध्यमातून सदर कागदपत्रे सीताबर्डीतील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गृहकर्ज प्रकरणाकरिता दाखल केली. या प्रकरणी देवेंद्र गोपाळराव मैराळ (५६) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स