निलंबित अधिकाऱ्याकडे बिलाची फाईल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - शौचालयाच्या नळातील पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याप्रकरणी शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. संबंधित कंत्राटदारदराचे बिलही रोखून पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. कंत्राटदाराचे बिल देण्यासाठी चक्‍क निलंबित अधिकारीच फाईल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे आल्याची माहिती आहे. 

जिल्हा क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्याप्रकरणी प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून इतरांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. तसेच भोजन कंत्राटदाराचे दोन लाख 80 हजारांचे बिल रोखून वित्त अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. वित्त अधिकाऱ्यांकडून अद्याप चौकशी अहवाल देण्यात आला नाही. त्यामुळे कंत्राटदाराच्या बिलावर शिक्षणविभागाकडून निर्णय घेण्यात आला नाही. 

निलंबित अधिकारी बिलाची फाईल घेऊन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे आला. मात्र, वित्त अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून लोखंडे यांनी फाईल परतून लावल्याची माहिती आहे. अधिकारी निलंबित असताना त्याच्याकडे फाईल आलीच, अशी असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. बिल देण्यासाठी पदाधिकाऱ्याकडूनही दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन परत घेण्याची मागणी शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात केली होती. 

Web Title: nagpur news The bill file with the suspended officer