पालक जाणार न्यायालयात!

पालक जाणार न्यायालयात!

नागपूर - सीबीएसईचा पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक त्रास देऊ नका, अशी मागणी करून शुक्रवारी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्याचा निर्णय पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे. सोबतच फेरपरीक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली जाणार आहे.

सीबीएसईचा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पेपर फुटल्याने आपण रात्रभर झोपलो नसल्याचे सांगून तातडीने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सीबीएसईचे विद्यार्थी व पालकांनी एकत्रित बैठक घेतली. यात सुमारे दीडशे ते दोनशे पालक सहभागी झाले होते. ज्या रिजनमध्ये पेपर फुटला त्याच रिजनमध्ये परीक्षा घ्यावी, इतरांना त्रास देऊ नये, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा आम्ही पुन्हा पेपर देणार नसल्याचे सांगितले. सीबीएसई बोर्डाचे काही अधिकारी यात दोषी असल्याने त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये असे सांगून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. अमित आनंद, सुनील लोंढे, अनिल वाडी, प्रदीप राऊत, सतीश हिवरकर, मंजूषा यावलकर, वैशाली भाकरे, नेहा जोशी, किशोर कोल्हे, अमित खरे, संजय थवरानी, अलका कालोरकर, आदिती उपाध्ये, शिल्पा परांजपे, प्रदीप सहारे, यशवंत इरफडे, पीयूष नवलाखे, संजय परांजपे, मीनल सुके यांच्यासह विद्यार्थी व पालक बैठकीला उपस्थित होते.

पेपर फुटल्याचे कळताच तातडीने फेरपरीक्षा जाहीर करण्याची गरज नव्हती. या प्रकरणाची आधी चौकशी करणे अपेक्षित होते. चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय केंद्रीय मंत्र्यांनी घ्यायला हवा होता. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचे प्रचंड दडपण असते. त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायला लावणे म्हणजे एकप्रकारचे मानवाधिकाराचे हननच होय.
- देवेंद्र घरडे, प्राध्यापक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com