कॉंग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांची हकालपट्टी? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - कॉंग्रेसने महापालिकेत नियुक्त केलेल्या अधिकृत गटनेत्याला खाली खेचून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या तसेच स्वतःचा गटनेता बनविणाऱ्या 15 नगरसेवकांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश कॉंग्रेसच्या आदेशावरून शहराध्यक्षांमार्फत बुधवारी सर्व संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यामुळे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

नागपूर - कॉंग्रेसने महापालिकेत नियुक्त केलेल्या अधिकृत गटनेत्याला खाली खेचून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या तसेच स्वतःचा गटनेता बनविणाऱ्या 15 नगरसेवकांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश कॉंग्रेसच्या आदेशावरून शहराध्यक्षांमार्फत बुधवारी सर्व संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यामुळे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

कॉंग्रेसने नगरसेवक संजय महाकाळकर यांची महापालिकेत गटनेता म्हणून नियुक्ती केली. मात्र, काही ज्येष्ठ नगरसेवक तसेच मुत्तेमवार विरोधी नेत्यांना हे चांगलेच खटकले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या घरी बैठक घेऊन 15 नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केला. संजय महाकाळकर सर्वांच्या पसंतीचे गटनेते नाहीत असे पत्र स्वाक्षरीनिशी विभागीय आयुक्तांकडे सादर केले. त्यांच्याऐवजी तानाजी वनवे यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. या अर्जावर एकूण 18 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. विभागीय आयुक्तांनी याची स्वाक्षऱ्यांची खातरजमा केली. एकूण 15 नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यानंतर नगरसेवकांचे बहुमत तानाजी वनवे यांच्याकडे असल्याचा दाखला देऊन त्यांना गटनेता म्हणून नियुक्त केले. 

प्रकरण न्यायालयात 
तानाजी वनवे यांच्या नियुक्तीला संजय महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या या प्रकरणावर युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयाने कॉंग्रेस तसेच महापौर तसेच महापालिका आयुक्त यांनाही या प्रकरणात प्रतिवादी केले आहे. वनवे समर्थक नगरसेवकांनी मध्यस्थी अर्जसुद्धा दाखल केला आहे. कॉंग्रेस पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी ऍड. अभिजित वंजारी यांची नियुक्ती केली आहे. 

सदस्यत्व होऊ शकते रद्द 
पक्षविरोधी कारवाया केल्याचे सिद्ध झाल्यास कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. याकरिता कारणे दाखवा नोटीस बजावून बंडखोर नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. जे उत्तर देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई निश्‍चित मानल्या जात आहे. बंडखोर नगरसेवकांचे नेतृत्व तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे करीत आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद, अशोक धवड, गेव्ह आवारी या नेत्यांनी गटनेता बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. 

बंडखोर नगरसेवक 
तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे, बंटी शेळके, हर्षला साबळे, गार्गी चोपरा, मनोज गावंडे, दिनेश यादव, संदीप सहारे, कमलेश चौधरी, परमेश्‍वर मानवटकर, आशा उइके, परिणिता शहाणे, नेहा निकोसे, सय्यद बेगम अन्सारी, पुरुषोत्तम हजारे. 

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017