मुख्याधिकाऱ्यांना दिले दूषित पाणी भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

रामटेक - शहरातील भगतसिंग वॉर्ड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना आजार बळावण्याचा धोका आहे. मंगळवारी येथील महिलांनी मोर्चा काढून मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना पाणीपुरवठ्याचे गढूळ पाणी भेट देण्यात आले. या प्रसंगी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

शहरातील भगतसिंग वॉर्ड येथे नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन महिन्यांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. त्यामुळे आजार बळावण्याची शक्‍यताही बळावली आहे. येथील पाईपलाईन ४७ वर्षे जुनी असून ठिकठिकाणी ती खराब झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा सुरळीत न होता दूषित होत आहे. येथे नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी करीत स्थानिक महिलांनी नळाला येत असलेले दूषित पाणी नगरपालिका मुख्याधिकारी मेंढे यांना भेट देत मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी नगरसेविका चित्रा धुरई, ॲड. अरुण महाजन, समाजसेवक तुळशीराम कोठेकार, भा. वि. सेना उपजिल्हाप्रमुख धीरज राऊत, प्रतिभा बिसन, माधुरी पांद्रे, काजल बिसन, कविता महाजन, सुषमा बिसन, वर्षा महाजन, कांता बिसन, मंगला बिसन, सुधीर धुळे, सौरभ कोल्हे, हर्षल भोपळे, निशांत महाजन, प्रणय अंजिरकर, गौरव महाजन आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.        

दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही, तर तेच दूषित पाणी सत्ताधिर्कायांना पाजण्यात येईल. या प्रकरणाची गंभीर दखल रामटेक नगरपालिकेनी घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भगतसिंग वॉर्डातील नागरिक आंदोलन करेल.
-बिकेंद्र महाजन, माजी नगरसेवक