पाच नगरसेवकांनी भरली थकबाकी

पाच नगरसेवकांनी भरली थकबाकी

नागपूर - एसएनडीएलने दोन नगरसेवकांकडील वीजपुरवठा बुधवारी खंडित केल्यानंतर या दणक्‍याची धास्ती घेत पाच नगरसेवकांनी गुरुवारी एकूण १ लाख ९२० रुपयांचा भरणा केला. नगरसेवकांकडील वीजबिलाची थकबाकी चव्हाट्यावर आल्यामुळे चांगलाच वादंग झाला. यानंतरही एसएनडीएलने आक्रमक भूमिका कायम ठेवली. बुधवारी नगरसेवक बंटी शेळके आणि कमलेश चौधरी यांच्याकडील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अन्य नगरसेवकांनी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीची रक्कम भरून घेतली.

सुषमा चौधरी यांच्याकडे वर्षभराच्या काळात ३० हजारांची थकबाकी जमा झाली. त्यांनी आता बिल भरणा केंद्रावर थकबाकीची रक्कम चुकती केली. मनोज चाफले यांनी दोन ते तीन महिन्यांच्या काळात थकलेले ११ हजार रुपये भरले. नगरसेविका चेतना टांक यांनीही दोन महिन्यांत थकलेले ४५ हजार ३६० रुपयांचा भरणा केला. मनीषा अतकरे यांनी सहा ते वर्षभरापासून थकीत असलेले ७ हजार ९०० रुपये भरले. कल्पना कुंभलकर यांच्याकडील दोन मीटरचे बिल तीन ते सहा महिन्यांपासून थकले होते. त्यांनी ४ हजार ८५० आणि १ हजार ८१० रुपये अदा केले. बुधवारी आठ नगरसेवकांनी तडकाफडकी थकबाकीचा भरणा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com