अल्पवयीन मुलीशी संबंध हा गुन्हाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हा गुन्हाच असल्याचे सांगत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी सोमवारी (ता. ३१) आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. घटनेच्या वेळी कायद्यानुसार मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झालेत की नाही, याचा संबंध येत नसल्याचा मुद्दा ग्राह्य धरण्यात आला. आरोपीचे नाव पुरुषोत्तम गोविंदा शेंडे (वय ४७, रा. नारी) असे असून, त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.   

ही घटना १ ऑगस्ट २०१५ रोजी घडली. आरोपीने आपल्या मुलीवर अत्याचार केला, अशी तक्रार या मुलीच्या पालकांनी केली होती. आरोपी आणि पीडित मुलीचे कौटुंबिक संबंध होते. यामुळे आरोपीचे तिच्या घरी येणे-जाणे होते. पीडितेचे वडील मजूर असून, आई गृहिणी आहे. एक दिवस तिची आई बाजारात गेली असताना आरोपी त्यांच्या घरी आला आणि तिच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलीने आईला सांगितली. बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही. याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला. अखेरीस मुलीच्या पालकांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी आरोपीवर भादंवि कलम ३७६ (२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या सहकलम ३, ४, ५ (एल) आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला. सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. 

खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष फिरविली. आरोपीने आपल्यासोबत मंदिरात लग्न केल्याचे बयाण तिने बचाव पक्षाने घेतलेल्या उलट तपासणीदरम्यान दिले. यानंतर सरकारी वकील ज्योती वजानी यांनी पीडित मुलीची परत एकदा साक्ष घेतली. या साक्षीदरम्यान तिने आपण शारीरिक संबंधांना संमती दर्शविल्याचे कबूल केले. 

पीडितेला सात हजार देण्‍याचा आदेश
कायद्यानुसार घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. यामुळे तिच्या संमतीचा प्रश्‍नच येत नाही. अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवल्यास तो अत्याचारच होतो, ही बाब ॲड. वजानी यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. ही बाब ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवीत त्याला शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतील ७ हजार रुपये रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: nagpur news crime girl