हुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले 

हुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले 

नागपूर - कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. येथून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कामठी मार्गावरील भीलगावजवळील एका इमारतीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सहाय्यक निरीक्षक सोपान चिटमपल्ले, गुलाब गिरडकर, राजेश पैडलवार, रूपेश कातरे, उपेंद्र आकोटकर आणि किशोर बिंबे यांनी सापळा रचून रविवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास मोहित गुप्ता याच्या मालकीच्या इमारतीच्या तिसऱ्या माळयावर छापा टाकला. त्या ठिकाणी ३८ जण हुक्का  पित होते व पूल खेळत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी तीन कार, अनेक दुचाकी असा एकूण २७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रॉनी रेमंड मायकर, पील दानेश खुशलानी, आशीष अशोककुमार बालानी, इमरान शेख  पापा शेख, रोहित नानक शुकरानी, विक्रम सरेशलाल तलरेडा, जफर कलीम मोहम्मद अब्दुल नईम, सुफीयान अनम खान मुर्तजा खान, दिपेश अशोक कटारिया, मनीष किशोर तेजवानी, आकाश मूलचंद उत्तमचंदानी, जलत सुरेश ग्यानचंदानी, हितेश मोहनलाल जेठानी, वारिस अख्तर मुमताज अहमद, जय नरेश वासवानी, प्रणय विकास रंगारी, साहिल लक्ष्मण तांबे, नेल्सन सयाम मैसी, धीरज मोहनकुमार हरचंदानी, मनीष प्रकाश वासवानी, दिलीप नानकराम कुकरेजा, मोहम्मद जुबेर कुदूश पटेल, शेख गुलाम दानिश अहमद शेख वहीद, गुफरान मोहम्मद शकील अकबानी, अरबाज अहमद अल्ताफ अहमद कुरेशी, मोहम्मद सोहेल मोहम्मद अफजल शेख, मोहम्मद फहीम मोहम्मद असलम, कुमार गंगाराम रूपवानी, कमल गिरधारी लालवानी, अनस शफी नसीमोद्दीन, मोहम्मद शाकीब अब्दुल साजीद शेख, फहीमुद्दीन इकरामुद्दीन सय्यद, हसनकाझी फजलू रहमान काझी, किशोर तोलाराम बनवानी, पंकज अनिल पंजवानी आणि हितेश वासुदेव देवानी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

ओल्या कुलरने लागला सुगावा
पोलिसांना माहिती मिळालेली इमारत पूर्णपणे बंद होती. त्या इमारतीत जवळपास शंभरावर खोल्या होत्या. प्रत्येक खोलीला दोन-दोन कुलूप लागलेले होते. इमारतीत प्रवेश करण्याचा मार्गही बंद होता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात पोलिस बाजूच्या इमारतीवर चढले. त्या इमारतीवरून आरोपी असलेल्या इमारतीत प्रवेश केला. त्यावेळी तिसऱ्या माळ्यावरील एका खोलीच्या खिडकीला लागलेला कुलर ओला दिसला. पोलिसांना संशय आल्याने खोलीला बाहेरून लागलेले दोन्ही कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्या ठिकाणी ३८ तरुण पूल खेळत होते व हुक्‍का पीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com