दोन महिला मद्यतस्कर अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी अंदमान एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत दोन महिला मद्यतस्करांना अटक करीत त्यांच्याकडून मद्यसाठा हस्तगत केला. 

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी अंदमान एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत दोन महिला मद्यतस्करांना अटक करीत त्यांच्याकडून मद्यसाठा हस्तगत केला. 

सपना कांपले (34) आणि स्नेहा निरंजन (30) दोन्ही रा. गंजवाडा, चंद्रपूर अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मद्यतस्करीला वेग आला आहे. ही बाबा लक्षात घेत रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईसाठी विशेष पथकाचे गठन केले आहे. हे पथक रविवारी दुपारी कर्तव्यावर असताना अंदमान एक्‍स्प्रेसमधून मद्यतस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ही रेल्वे दुपारी 12.30 वाजता नागपूर स्थानकाच्या फलाट 2 वर येऊन थांबताच पथकाने गाडीचा ताबा घेतला. सपना ही एस -5 क्रमांकाच्या बोगीजवळ संशयास्पद असवस्थेत वावरताना दिसली. तिच्याकडे तीन पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅग होत्या. संशयाच्या आधारे कॅरीबॅगची तपासणी केली असता त्यात मद्यसाठा आढळला. पथकातील काही सदस्यांनी एस-4 क्रमांकाच्या बोगीत झाडाझडती घेतली असता स्नेहाकडे पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅग आढळल्या. संशयाच्या आधारे तिच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यातही मद्यसाठा आढळला. दोन्ही बॅगमध्ये दारूच्या एकूण 25 बाटल्या आढळल्या. दोन्ही महिलांना तसेच मद्यसाठा पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: nagpur news crime railway